मुंब्य्रातील फेरीवाल्यांवर संयुक्त कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:40 AM2021-03-18T04:40:52+5:302021-03-18T04:40:52+5:30
मुंब्राः येथील मुख्य रस्ता फेरीवालामुक्त करा, या गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानंतर पोलीस आणि ठामपा प्रशासनाने बुधवारी रस्त्यावर व्यवसाय ...
मुंब्राः येथील मुख्य रस्ता फेरीवालामुक्त करा, या गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानंतर पोलीस आणि ठामपा प्रशासनाने बुधवारी रस्त्यावर व्यवसाय करणा-या फेरीवाल्यांवर संयुक्त कारवाईस सुरुवात केली. याअंतर्गत फेरीवाल्यांच्या ६० हातगाड्या तोडून जप्त केलेल्या वस्तूंवर दंडात्मक कारवाई केली.
रस्त्यावर पुन्हा फेरीवाल्यांनी ठाण मांडू नये, यासाठी सध्या अतिक्रमणविरोधी पथकाचे १५ कर्मचारी रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर सातत्याने गस्त घालत आहेत. ज्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत आहे, त्यांना मित्तल मैदानातील बाजारपेठेत स्थलांतरित होण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्याला बहुतांशी फेरीवाले सकारात्मक प्रतिसाद देत असल्याची माहिती मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सागर साळुंखे यांनी लोकमतला दिली.