विशाखापट्टणम व नवघर पोलिसांच्या संयुक्त कारवाई, नोकरीचे आमिष दाखवून लुटणारी टोळी अटकेत

By धीरज परब | Published: December 27, 2022 10:49 AM2022-12-27T10:49:25+5:302022-12-27T10:50:28+5:30

मोठ्या प्रमाणात मोबाईल , सिम कार्ड जप्त तर अनेक बनावट खाती उघडकीस 

Joint operation of Visakhapatnam and Navaghar police arrested a gang of 6 people | विशाखापट्टणम व नवघर पोलिसांच्या संयुक्त कारवाई, नोकरीचे आमिष दाखवून लुटणारी टोळी अटकेत

विशाखापट्टणम व नवघर पोलिसांच्या संयुक्त कारवाई, नोकरीचे आमिष दाखवून लुटणारी टोळी अटकेत

Next

मीरारोड - आंध्र प्रदेशातील, विशाखापट्टणम शहरातील सिरिकी मानसा यांना नौकरीचे आमिष देऊन त्यांना बनावट लिंक द्वारे १३ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी विशाखापट्टणम पोलिसांनी नवघर पोलिसांच्या सहकार्याने सहा आरोपिंना अटक केली आहे.  आरोपी हे विविध प्रकारे ऑनलाईन फसवणूक करण्यात सराईत असून त्यांचे कनेक्शन परदेशा पर्यंत आहे . आरोपीं कडून ३० मोबाईल, ५ इंटरनेट राउटर, ६९ सिमकार्ड, विविध कंपन्याचे ५६ रबरी स्टॅम्प तसेच वेगवेगळ्या बँकाचे २६ ए.टी.एम. कार्ड असा ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

सिरिकी यांची फसवणूक प्रकरणी विशाखापट्टणम पोलिसांच्या सायबर सेल ने गुन्हयाच्या तपासात फिर्यादी यांची फसवणुक झालेली रक्कम विरारच्या यस  बँक शाखेतील खात्यात वर्ग झाल्याचे आढळून आले . तर त्या खात्यास लोंक असलेला मोबाईल क्रमांक हा भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाणे हद्दीतील असल्याचे समोर आले. विशाखापट्टणम सायबर शाखेचे पोलीस निरीक्षक के. भवानी प्रसाद राव सह श्रीनिवास राव, पी. क्रिष्णा, एस. के. एम. बाशा, बि.व्ही. सतीश कुमार हे पथक आरोपींना पकडण्यासाठी मीरा भाईंदर मध्ये आले होते . त्यांनी नवघर पोलिसांचे सहकार्य मागितले होते.  

नवघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई,  पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश मासाळ, सहायक निरीक्षक योगेश काळे, उपनिरीक्षक अभिजित लांडे तसेच भूषण पाटील, गणेश जावळे, सुरेश चव्हाण, नवनाथ घुगे, पोशि, ओंकार यादव, सूरजसिंग घुनावत, विनोद जाधव व पोलीस मित्र करण शाह यांनी विशाखापट्टणम पोलीस पथकासह संयुक्त कारवाई करत सुमन शहा. रा. नॅशनल डेअरी जवळ, भाईंदर पूर्व ह्याला पकडले . त्याच्या चौकशी नंतर शुभम नरेंद्र सिंग, दिपक सरगरा, रणविर चौहाण, मिला जाट, विकास बनिता सर्व रा. भिलवाडा, राजस्थान सध्या रा. सी वुड, नवी मुंबई ह्यांना अटक करण्यात आली आहे . 

गुन्ह्यातील म्होरक्या व पाहिजे आरोपी प्रदिप चौधरी हा भिलवाडा, राजस्थान येथे राहणार आहे . ऑनलाईन खेळ सह विविध प्रकारे ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी बनावट स्टॅम्प व कागदपत्रे बनवून बनावट कंपन्या तयार करून चालू खाती उघडली गेली आहेत . सिम कार्ड सुद्धा बनावट कागदांच्या आधारे केलेली आहेत . फसवणूक करून आलेली रक्कम परदेशातील खात्यात गेल्याची शक्यता आहे . चौधरी हा बनावट खाते उघडणे, सिमकार्ड आदींसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये ते २ लाख रुपयांपर्यंत द्यायचा . अटक आरोपीना विशाखापट्टणम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . 

Web Title: Joint operation of Visakhapatnam and Navaghar police arrested a gang of 6 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.