जोशी - बेडेकरचा 'क्रिसलिस ' ( chrysalis ) २०१९ या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 05:21 PM2019-08-27T17:21:33+5:302019-08-27T17:25:12+5:30

जोशी - बेडेकर आयोजित आंतरमहाविद्यालयीन महोत्सवात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

Joshi - Inauguration of Bedekar's 'Chrysalis' 29th Inter-School Festival | जोशी - बेडेकरचा 'क्रिसलिस ' ( chrysalis ) २०१९ या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

जोशी - बेडेकरचा 'क्रिसलिस ' ( chrysalis ) २०१९ या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

Next
ठळक मुद्देख्रिसलीस २०१९ या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे उद्घाटनEven if you win the rat race, You're still a Rat : शुभ्रअरविंद बिराबरविज्ञान,  वाणिज्य व प्रबंधन क्षेत्रात नैतिक मूल्यांची आत्यंतिक गरज : डॉ सुचित्रा नाईक

ठाणे : विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात ख्रिसलीस २०१९ या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे उद्घाटन झाले. ख्रिसलीस म्हणजे कोशात असलेला सुरवंट ज्याचं फुलपाखरात रूपांतर होते. साध्या किड्यापासून फुलपाखरात संक्रमणाचा हा उपयुक्त कालखंड. या महोत्सवात मुंबई व ठाण्यातील बहुसंख्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यासक शुभ्रअरविंद बिराबर उपस्थित होते. 

      व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक, ख्रिसलीस समन्वयक डॉ संगीता दास, उप समन्वयक तृप्ती कौतिकवार उपस्थित होत्या. या वर्षीचा ख्रिसलीस महोत्सव शाश्वत विकास (sustainable development) या विषयावर समायोजित करण्यात आला. डॉ संगीता दास यांनी ख्रिसलीस महोत्सवाची एकूणच संकल्पना विशद केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक आपल्या भाषणात म्हणाल्या की, शाश्वत विकास हा मानवी संवेदनांचा व भावनांचा एकात्मिक परिपाक असतो. व्यक्तीला विकासाच्या वाटेवर मानवी मूल्यांची अत्यंत गरज आहे.  जो स्वतःच्या व्यक्तीमत्वात समतोल राखतो तोच चांगला व्यवस्थापक (Manager) होऊ शकतो. विज्ञान,  वाणिज्य व प्रबंधन क्षेत्रात नैतिक मूल्यांची आत्यंतिक गरज आहे असं डॉ नाईक म्हणाल्या. अतिथी  शुभ्रअरविंद बिराबर म्हणाले कि आपण सर्वजण प्राणांतिक स्पर्धेच्या युगात वावरत आहोत. ते म्हणाले की, " Even if you win the rat race, You're still a Rat". स्पर्धा व यशाच्या मागे लागलेल्या आपणा सर्वांना आनंद व सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. हॅपिनेस इंडेक्स मध्ये भारत पाकिस्तान व भूतान या देशांच्याही खाली आहे. ज्या प्रमाणे एखादं फुल उमलत तेंव्हा त्याचा सुगंध आपसूकच यायला लागतो, फुलाला आपल्या सुगंधाची जाहिरात करावी लागत नाही. त्याप्रमाणे यशस्वी व्यक्ती होण्यासाठी स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणावा लागेल तेंव्हाच त्याच्या कीर्तीचा सुगंध येईल.  व्यक्तीच्या विकासात त्याचा अध्यात्मिक विकास होणे फार महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन शुभ्र अरविंद यांनी केले. क्रिसलिस २०१९ ची  "शाश्वत" (SHASHWAT ) ही संकल्पना घेऊन प्रथम १९ ऑगस्ट २०१९ रोजी सामुदायिक स्वच्छता मोहिमेने,त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी स्टार्टअप इव्हेंट आणि युटूबर्स चर्चासत्र आणि २२ ऑगस्ट रोजी डॉ.संजय मंगला गोपाळ यांचे व्याख्यान यांनी सुरुवात झाली. सुभ्ररा बिंदा बिरारर,संधू लोगीपार्क ग्रुप चे सीईओ यांच्या हस्ते २३ ऑगस्ट २०१९ रोजी औपचारिक उद्घाटन करण्यात आले. प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक मॅडम यांचे शुभाशिर्वाद या कार्यक्रमाला मिळाले. उद्घाटनानंतर विविध क्षेत्रातील नामवंत वक्त्यांच्या उपस्थितीत "शाश्वततेचे विविध आधारस्तंभ" या विषयावर  पॅनेल चर्चा करण्यात आली. त्यानंतर व्यवस्थापन व मीडिया विभागाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या. एकूण ४५ महाविद्यालयांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला व प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक आणि उपप्राचार्या प्रा.प्रियंवदा टोकेकर यांच्या हस्ते शेवटी सी.एच.एम महाविद्यालयाला फिरता चषक प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम सर्व प्रशासकीय कर्मचार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यापन, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला. संपूर्ण कार्यक्रम, समन्वयक डॉ.संगिता एस मोहंती आणि सह-समन्वयक तृप्ती कौतिकवार यांच्या सह्कार्याखाली संपन्न झाला. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. 

Web Title: Joshi - Inauguration of Bedekar's 'Chrysalis' 29th Inter-School Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.