पत्रकार, बँक कर्मचाऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:41 AM2021-04-07T04:41:20+5:302021-04-07T04:41:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोना आपत्तीच्या काळात पहिल्या दिवसापासून फिल्डवर कार्यरत असलेले पत्रकार व आर्थिक गाडा सांभाळणाऱ्या बँक ...

To journalists, bank employees | पत्रकार, बँक कर्मचाऱ्यांना

पत्रकार, बँक कर्मचाऱ्यांना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोना आपत्तीच्या काळात पहिल्या दिवसापासून फिल्डवर कार्यरत असलेले पत्रकार व आर्थिक गाडा सांभाळणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे, अशी मागणी भाजपने केली आहे. आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन लवकरात लवकर पत्रकार व बँक कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याची मागणी केली.

कोरोना आपत्तीकाळात ठाणे शहराबरोबरच जिल्ह्याच्या विविध भागांतील वास्तव परिस्थितीची माहिती पत्रकारांनी समाजमाध्यमे व वर्तमानपत्रांमार्फत पोहाेचविली होती. त्यातून सरकारी यंत्रणांना उपाययोजना करता आल्या. त्याचबरोबर बँकेतील कर्मचाऱ्यांनीही आर्थिक यंत्रणेचा गाडा कायम सुरू ठेवला होता. या काळात पत्रकार व बँक कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाची बाधा झाली होती. आता दुसऱ्या लाटेतही पत्रकार व बँक कर्मचारी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे त्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.

Web Title: To journalists, bank employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.