महिलांचा प्रवास होणार सुरक्षित आणि सुखकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:44 AM2021-09-06T04:44:39+5:302021-09-06T04:44:39+5:30

कल्याण : महिलांसाठी विशेष तेजस्विनी बसची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाच्या या चार बसचे मंगळवारी ...

The journey of women will be safe and comfortable | महिलांचा प्रवास होणार सुरक्षित आणि सुखकर

महिलांचा प्रवास होणार सुरक्षित आणि सुखकर

Next

कल्याण : महिलांसाठी विशेष तेजस्विनी बसची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाच्या या चार बसचे मंगळवारी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण होणार आहे. त्याचबरोबर कल्याण-डोंबिवली शहरदर्शन बससेवेचाही शुभारंभ होणार आहे.

महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य सरकारने महिला प्रवाशांसाठी तेजस्विनी बसयोजना सुरू केली आहे. केडीएमटी उपक्रमासाठी सरकारकडून या बस मंजूर झाल्या. त्यासाठी येणारा भांडवली खर्च म्हणून सरकारकडून या उपक्रमाला एक कोटी २० लाख मंजूर झाले. बस खरेदीसाठी पाच ते सहा वेळा निविदा काढल्या. परंतु, सुरुवातीला प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, फेब्रुवारी २०२१ मध्ये पुन्हा काढलेल्या निविदेला मंजुरी मिळाली आणि या बस उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाल्या. विशेष बाब म्हणजे या लेडिज स्पेशल बसमध्ये वाहक म्हणून १२ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. दुसरीकडे शहरातील पर्यटनस्थळांचा लाभ घेण्यासाठी केडीएमटीकडून एक विशेष बस सोडण्यात येणार आहे. त्याचेही लोकार्पण मंगळवारी होत आहे. आगळावेगळा लूक असलेल्या या बसच्या निर्मितीचे काम जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी केले आहे. सार्वजनिक सुट्टी, शनिवार, रविवार आणि प्रवाशांच्या मागणीनुसार ही बस धावणार असून त्याचे भाडे प्रतिप्रवासी १५० रुपये आहे. कल्याण रेल्वेस्टेशन (पश्चिम), शिवाजी चौक, सुभेदारवाडा, पारनाका, अक्षत गणपती, पोखरण, त्रिविक्रम मंदिर, देवीचे देऊळ, दुर्गाडी किल्ला, गणेशघाट (खाडीकिनारा), प्रबोधनकार ठाकरे सरोवर (बाळासाहेब ठाकरे स्मारक), टिटवाळा गणपती मंदिर, गोवेलीमार्गे बिर्ला मंदिर, सुभाष चौक, वालधुनी ब्रिजमार्गे पुना लिंक रोडमार्गे खिडकाळी शिवमंदिर, पिंपळेश्वर महादेव मंदिर, गणपती मंदिर (डोंबिवली पूर्व), कॅप्टन विनयकुमार सच्चन (आजदेगाव), कल्याण रेल्वेस्टेशन (पश्चिम) ही बस धावेल.

------------------------------------------------------

अशी धावणार ‘तेजस्विनी’

कल्याण

कल्याण-रिंगरूट (बिर्ला कॉलेज मार्गे ) धावताना रेल्वे स्टेशन, रामबाग स्टेट बँक, सिंधीगेट, प्रेम ऑटो, बिर्ला कॉलेज, चिकणघर, खडकपाडा, आधारवाडी चौक, वाडेघर, दुर्गाडी चौक, लालचौकी, गणोश टॉवर, तेलवणे हॉस्पिटल, सहजानंद चौक, शिवाजी चौक, गुरूदेव हॉटेल, कल्याण रेल्वे स्टेशन मार्गावर सकाळी ७ ते रात्री पावणेनऊच्या दरम्यान धावेल. कल्याण-मोहना कॉलनी धावताना कल्याण रेल्वे स्टेशनवरून प्रेम ऑटो मार्गे पुढे शहाड फाटक, आयडीआय गेट, वडवली फाटक, शिवसृष्टी, मोहना गेट, आरएस, मोहना कॉलनी, आंबिवली, गाळेगाव, चैतन्य निवास, मोहीली गाव, मानिवली फाटा, मानिवली, पुन्हा मोहना कॉलनी ते कल्याण अशी बस सकाळी साडेसहा ते रात्री साडेआठच्या दरम्यान धावेल.

----------------

डोंबिवली

डोंबिवली-लोढा हेवन- निळजे स्टेशन या मार्गावर धावताना डोंबिवली स्टेशन (पुर्व), चाररस्ता, गावदेवी, शिवाजी उद्योगनगर, स्टार कॉलनी, संघवी गार्डन, आनंद केमिकल्स, मानपाडा, प्रिमिअर कॉलनी, कोळेगाव फाटा, काटईगाव, लोढा हेवन, शिवाजी चौक, निळजे स्टेशन, तसेच पुन्हा निळजे स्टेशन ते डोंबिवली अशी बस धावेल. डोंबिवली-निवासी विभाग अशीही बस धावणार आहे. यात डोंबिवली स्टेशन, पारसमणी, शेलारनाका, आजदेगाव, पेंढारकर कॉलेज, मिलापनगर, ममत हॉस्पिटल, मॉडेल कॉलेज, निवासी विभाग, पुन्हा डोंबिवली स्टेशन अशी बस धावणार आहे.

----------------

Web Title: The journey of women will be safe and comfortable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.