आधी शेतकऱ्यांना न्याय द्या, मगच मेट्रो कारशेडचे काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 01:28 AM2019-11-15T01:28:07+5:302019-11-15T01:28:11+5:30

घोडबंदर भागातील मोघरपाड्यात १०० एकर खारभूमी जमिनीवर मेट्रो कारशेडचे काम हाती घेण्यात येणार आहे.

Judge farmers first, then work the Metro Carshed | आधी शेतकऱ्यांना न्याय द्या, मगच मेट्रो कारशेडचे काम करा

आधी शेतकऱ्यांना न्याय द्या, मगच मेट्रो कारशेडचे काम करा

Next

ठाणे : घोडबंदर भागातील मोघरपाड्यात १०० एकर खारभूमी जमिनीवर मेट्रो कारशेडचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी ओवळा, मोघरपाडा येथे शेतकऱ्यांची जमीन एमएमआरडीएला हवी आहे. मात्र, शेतकºयांना त्याचा योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे, शेतकºयांचे पूर्ण समाधान करा, त्यांना न्याय द्या मगच पुढे कारशेडचे काम सुरू करा, अशी भूमिका शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी घेतली. ओवळा, मोघरपाडा येथे जमलेल्या शेतकरी व एमएमआरडीएच्या अधिकाºयांसमोर त्यांनी ही मागणी केली.
ठाण्यातील ओवळा, मोघरपाडा येथे खारभूमी परिसर असून जुना सर्व्हे नंबर २८ (नवीन सर्व्हे नंबर ३०) येथे वर्षानुवर्षे शेतकरी भातशेती करतात. पूर्वीच्या काळापासून जवळपास येथे एकूण १८७ कुटुंबे शेती करीत आहेत. प्रत्यक्षात आजही शेती करणाºयांची संख्या जास्त आहे. या जागेत स्वातंत्र्यपूर्व काळापासून शेतकरी भातशेती करतात. काही लोक येथे खाडीकिनारी मासेमारी करायचे. खाडीचे भरतीओहोटीचे पाणी शेतात यायचे व यामुळे भातशेतीचे नुकसान व्हायचे, त्यामुळे या परिसरात त्यावेळच्या सरकारने १९६० साली शेतकºयांना येथे एक बंधारा बांधायला लावला. यामुळे जमिनीचे रक्षण होऊन शेतीचे क्षेत्र वाढले. १९६० मध्ये १६७ लोकांना भातशेती करण्यासाठी प्रत्येकी ६४ गुंठे जागा सरकारकडून देण्यात आली.
इतरांना तोंडी भातशेती करण्यासाठी त्यावेळच्या अधिकाºयांनी येथील जमीन देण्यात आली. मात्र, ही जमीन कसणाºया शेतकºयांच्या नावाची नोंद सरकारदरबारी पुढे झाली नाही. परंतु, अनेक शेतकरी वर्षानुवर्षे ती करत आहेत.
>शेतकºयांना नोटिसा दिल्याच नाहीत
एमएमआरडीएने आता मेट्रो कारशेडचे आरक्षण ओवळा-मोघरपाडा येथील या खारभूमी जागेत टाकले आहे. यासाठी सुमारे १०० एकर जागा हवी आहे. या जागेच्या सर्व्हेसाठी एमएमआरडीएचे अधिकारी याठिकाणी गुरुवारी आले असता सुमारे २५० शेतकरी त्याठिकाणी हजर होते. यानंतर, आमदार सरनाईक यांनी याठिकाणी हजेरी लावली. एमएमआरडीएकडून या शेतकºयांना कोणत्याही प्रकारच्या नोटिसा देण्यात आलेल्या नसल्याचे निदर्शनास आणून त्यांनी आधी शेतकºयांचे समाधान करा. त्यांना शासकीय नोकरीत स्थान द्या, जमिनींचा योग्य मोबदला द्या, त्यांच्या इतर मागण्या मान्य करा. त्यानंतरच कारशेडचे काम सुरू करा, असे सांगितले. यावेळी स्थानिक नगरसेवक नरेश मणेरा, नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर, नगरसेविका नम्रता घरत तसेच स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Judge farmers first, then work the Metro Carshed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.