रिक्षाचालकांना मदत मिळण्यास उजाडणार जून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:42 AM2021-05-07T04:42:39+5:302021-05-07T04:42:39+5:30

ठाणे : लॉकडाऊनच्या काळात रिक्षाचालकांच्या खात्यात १,५०० रुपये जमा करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा केवळ फार्स ठरली आहे. ...

June to get help for rickshaw pullers? | रिक्षाचालकांना मदत मिळण्यास उजाडणार जून?

रिक्षाचालकांना मदत मिळण्यास उजाडणार जून?

Next

ठाणे : लॉकडाऊनच्या काळात रिक्षाचालकांच्या खात्यात १,५०० रुपये जमा करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा केवळ फार्स ठरली आहे. १३ एप्रिलला मदतीची घोषणा झाली असली, तरी प्रत्यक्ष ती मिळण्यास जून उजाडणार आहे. याकडे भाजपचे नगरसेवक व भाजप रिक्षाचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संजय वाघुले यांनी लक्ष वेधले आहे. लॉकडाऊनच्या काळातच पैशांची गरज असताना केवळ घोषणा करून राज्य सरकारने फसवणूक केली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

राज्यात लॉकडाऊन जाहीर करताना ठाकरे यांनी रिक्षाचालकांच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्याची घोषणा केली होती. मुंबई-ठाणे जिल्ह्यात सुमारे तीन लाखांहून अधिक परमिटधारक रिक्षाचालक आहेत. १ एप्रिलपासून सरकारचे निर्बंध व १५ एप्रिलपासून लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर लवकर मदत मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, आतापर्यंत एक रुपयाही मिळालेला नाही. सध्या आरटीओकडून रिक्षाचालकांचे बँकेतील खाते क्रमांक आधारकार्डला लिंक करण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण होण्यास जून उजाडणार आहे. त्यानंतरच रिक्षाचालकांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

श्रेय घेण्यासाठी धडपड

आधारकार्ड लिंक करण्यातच दोन महिने जाणार आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये केवळ श्रेय घेण्यासाठी रिक्षाचालकांना १५०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली, असा आरोप वाघुले यांनी केला. रिक्षाचालकांना तत्काळ मदत देण्यासाठी परमिटनुसार थेट मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

--------------

Web Title: June to get help for rickshaw pullers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.