आमदारकीसाठी ज्योती कलानी, गणेश नाईक यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 03:40 AM2018-10-21T03:40:10+5:302018-10-21T03:40:11+5:30

शहर- जिल्हा कार्यकारिणी बैठकीत राष्ट्रवादी पक्षाचे नेते गणेश नाईक यांनी ज्योती कलानी यांची विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर केली.

Jyoti Kalani for MLA candidate, Ganesh Naik's announcement | आमदारकीसाठी ज्योती कलानी, गणेश नाईक यांची घोषणा

आमदारकीसाठी ज्योती कलानी, गणेश नाईक यांची घोषणा

Next

- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहर- जिल्हा कार्यकारिणी बैठकीत राष्ट्रवादी पक्षाचे नेते गणेश नाईक यांनी ज्योती कलानी यांची विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर केली. शनिवारी झालेल्या बैठकीत कलानी यांनी जम्बो कार्यकारिणी जाहीर केली. पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री व नगरसेवकांनी बैठकीवर बहिष्कार घातल्याने पक्षातील वाद चव्हाटयावर आला आहे.
नाईक, प्रमोद हिंदुराव यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. बैेठकीला नगरसेविका सुनीता बगाडे, सुमन सचदेव यांच्यासह गंगोत्री ग्रू्रपचे पदाधिकारी व कार्यकर्तेे गैरहजर होते. त्यांच्या बहिष्काराबाबत नाईक यांना विचारले असता गंगोत्री पक्षाचे नेते असून त्यांच्यासह नगरसेवक बाहेर गेले असावेत, अशी सारवासारव नाईक यांनी केली. आमदार कलानी पक्षाच्या बलाढय उमेदवार असून विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करतील असा दावा त्यांनी केला.
शहर राष्ट्रवादी पक्ष गंगोत्री व आमदार कलानी यांच्यात विभागली आहे. कलानी यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेवूनही कारवाई करण्याऐवजी त्यांची शहर- जिल्हाध्यक्षपदी निवड केली, असा आरोप गंगोत्री यांनी केला
आहे.
कलानी यांच्या नेतृत्वाखाली काम करणार नसल्याचे गंगोत्री गटाने यापूर्वीच जाहीर केले. तसे पत्र त्यांनी वरिष्ठ नेत्यांना दिले आहे. राष्ट्रवादीचे कलानी प्रेम पुन्हा उघड झाल्याची टीका शहरातून होत आहे. विधानसभा निवडणुकीला दीड वर्षे असले तरी आतापासूनच उल्हासनगरध्ये राजकीय वातावरण तापू लागले
आहे.
पालिकेत भाजपाने ओमी टीमला हाताशी धरून सत्ता स्थापन केली आहे. त्यातच आता पंचम कलानी यांना महापौरपद मिळाल्याने याचा फायदा ज्योती कलानी यांना होऊ शकेल असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दरम्यान, यापूर्वीही राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटतील असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. पक्षातील वाद वेळीच थोपवला नाहीतर पक्षाला नुकसान सहन करावे लागेल असेही बोलले जात आहे.
>बहुतांश पदाधिकारी ओमी टीममध्ये सक्रिय
आमदार ज्योती कलानी यांनी ५७ जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली. कार्याध्यक्षपदी माजी नगरसेवक दर्शनसिंग खेमानी तर उल्हासनगर विधानसभा अध्यक्षपदी डॉ. सुरेंद्र सिंग यांची निवड केली. सहा उपाध्यक्ष, आठ महासचिव, सात सचिव, एक प्रवक्ता, २६ सदस्य, दोन सल्लागार आणी चार ब्लॉक अध्यक्षांची निवड केली. नव्या कार्यकारिणीतील बहुतांश जण ओमी टीममध्ये सक्रीय असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Jyoti Kalani for MLA candidate, Ganesh Naik's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.