रायगडवासीयांसाठी धावले के डीएमसीचे आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 12:33 AM2020-06-09T00:33:53+5:302020-06-09T00:34:02+5:30

कल्याण-डोंबिवलीतून ट्रक रवाना : १० टन्न अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंची मदत

K DMC Commissioner ran for Raigad residents | रायगडवासीयांसाठी धावले के डीएमसीचे आयुक्त

रायगडवासीयांसाठी धावले के डीएमसीचे आयुक्त

Next

अलिबाग : ज्या भूमीमध्ये काम केले, ज्या नागरिकांनी प्रेम के ले जीव लावला तीच भूमी आज निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झाली आहे. तेथील नागरिकांच्या घरांवरील छप्पर उडाले आहे. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आहे. त्यात पावसामुळे घरातील अन्नधान्याचे नुकसान झाल्याने काय खायचे? हा मोठा प्रश्न या नागरिकां पुढे आहे. त्यामुळे अन्ना वाचून या नागरिकांचे हाल होत आहेत. हि बाब रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांना समजली तेंव्हा क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी रायगडसाठी १० टन अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू पाठविल्या आहेत. डॉ. विजय सूर्यवंशी हे सध्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त या पदावर कायरत आहे.

रायगड जिल्ह्याला चक्र ीवादळाचा मोठा फटका बसला आहे. वादळामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे कपडे भिजून गेले. अन्नधान्य मातीमध्ये गाडले गेले. यामुळे उपासमारीची वेळ किनारपट्टीवरील नागरिकांवर आली आहे. त्यामुळे रायगडकर अडचणीत असताना आपल्याकडून काहीतरी मदत व्हावी, यासाठी रायगडचे यापूर्वीचे जिल्हाधिकारी आणि आताचे कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुढाकार घेतला. सुयर्वंशी रायगडमधील नुकसानग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन कल्याण-डोंबिवली येथील नागरिकांना केल्यानंतर त्यांच्याकडे ‘महाराष्ट्र चेंबर आॅफ हाऊसिंग इंडस्ट्री कल्याण डोंबिवली’ने १० टन अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू रायगडकरांच्या मदतीसाठी पाठवून दिल्या आहेत. यामध्ये तांदूळ, डाळ, तेल, पीठासह १३ जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. प्रत्येकी १२ किलो वजनाचे किट घेऊन ट्रक कल्याणहून रायगडच्या दिशेने निघाले आहेत.
रायगडकरांचे या वादळाने किमान पुढच्या दहा वर्षांचे उत्पन्नाचे साधन नष्ट केले आहे. याची जाणीव ठेवून डॉ. विजय सूर्यवंशी यांनी राज्यातून सर्वप्रथम मदतीचा हात दिला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यातूनही अशाप्रकारे मदत मिळाल्यास रायगडवासियांना दिलासा मिळेल.

रायगड जिल्हयावर निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे संकट आले आहे. वादळाचा तीव्र धका रायगडच्या किनारपट्टीला बसल्याने तेथील नागरीक आपला संसार पुन्हा कसा थाटायचा या विवंचनेत आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ पत्रे व अन्न मिळावे यासाठी प्रयत्नात होतो. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधून रायगडच्या मदतीसाठी आम्ही तयार असल्याचे सांगून त्यांनी तात्काळ परवानगी दिल्याने आम्ही तत्परतेने मदतीचा हात पुढे केला असल्याचे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

रायगडातील जनतेवर आभाळ कोसळले आहे. छत उडाले आहे. अन्नधान्य भिजले आहे. किनापट्टीवरची माणसं अक्षरश: उघड्यावर आली आहेत. त्यांना मदतीची आवश्यकता असताना रायगडकरांच्या मदतीला सर्वप्रथम कल्याण-डोंबिवलीकर धावले आहे. येथील ‘महाराष्ट्र चेंबर आॅफ हाऊसिंग इंडस्ट्री कल्याण डोंबिवली’ या संस्थेने १० टन अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तू पाठवल्या आहेत.

Web Title: K DMC Commissioner ran for Raigad residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.