कबड्डी असो. निवडणुकीत शिवसेनेला धोबीपछाड, भाजपचा विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 01:04 AM2019-11-13T01:04:33+5:302019-11-13T01:05:05+5:30
एकीकडे राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होता राहिले असून शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता निर्माण झाल्याचे चित्र आहे.
ठाणे : एकीकडे राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होता राहिले असून शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता निर्माण झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे ठाण्यातही शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगू लागला आहे.यात ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या धर्मवीर कबड्डी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला असून त्यांनी शिवसेनेच्या देवराम भोईर यांच्या पॅनलचा धुव्वा उडविला.
राज्यात महाशिवआघाडीचे वारे वाहत आहेत. तर ठाणे महापालिकेच्या महासभेतही महाशिवआघाडीचे दर्शन ठाणेकरांना झाले.एकूणच प्रत्येक ठिकाणी आता भाजपला सळो की पळो करून सोडण्यासाठी शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्टÑवादी जिवाचा आटापिटा करू लागले आहेत. परंतु, यात ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनवर शिवसेनेची असलेली घट्ट पकड नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सैल झाल्याचे उघड झाले. रविवारी पार पडलेल्या या निवडणुकीत भाजपने शिवसेनेचा पॅनलचा पुरत धुव्वा उडवून भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या धर्मवीर पॅनलचे सर्व सदस्य मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यांनी अध्यक्षपदाच्या लढतीत शिवसेना नगरसेवक देवराम भोईर यांचा तब्बल ८२ मतांनी पराभव करून एकतर्फी विजय मिळवला. तीन फेरीत झालेल्या मतमोजणीत शिवसेनेचे देवराम भोईर यांना पहिल्या फेरीत ४९ तर भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांना १४ मते पडली. त्यामुळे पुन्हा कबड्डीवर शिवसेनेची पकड कायम राहिल, असे चित्र निर्माण झाले होते. दुसऱ्या फेरीतही भोईर यांनी आघाडी कायम राखली. मात्र, त्यानंतर झालेल्या तिसºया फेरीत भोईर यांना १५१ तर पाटील यांना तब्बल २७७ मते मिळाली आणि त्यांना विजय खेचून आला.
> विजयी झालेले शिलेदार
कृष्णा पाटील (अध्यक्ष), मनोज पाटील (कार्याध्यक्ष), मालोजी भोसले (सरचिटणीस), रतन पाटील (कोषाध्यक्ष), मंदार तावडे (सह कोषाध्यक्ष), भगीरथ पाटील, राजेंद्र मुणनकर,सुरेश तारे आणि विशाल गलगुडे यांची सहचिटणीसपदी निवड झाली. तर १० जण सदस्य म्हणून निवडून आले आहेत.