केडीएमसी आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 11:30 PM2018-08-22T23:30:32+5:302018-08-22T23:31:06+5:30

नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचल्याने आयुक्तांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली

Kadmosi Commissioner's hometown | केडीएमसी आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी

केडीएमसी आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी

Next

डोंबिवली : पूर्वेतील नांदिवली परिसरातील समस्यांची आयुक्त गोविंद बोडके यांनी मंगळवारी भरपावसात पाहणी केली. यावेळी नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचल्याने आयुक्तांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. नागरिक त्रस्त असतानाही झोपा का काढता, अशा शब्दांतच विचारणा करताना समस्या तातडीने सोडवा, असे आदेश संबंधित विभागास दिले आहे.
नांदिवलीतील समस्यांची पाहणी करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेविका प्रेमा म्हात्रे, रवी म्हात्रे, रूपाली म्हात्रे, प्रकाश म्हात्रे यांनी बोडके यांच्याकडे केली होती. त्यानुसार, मंगळवारी त्यांनी ही पाहणी केली. मानपाडा रोडवरील युनियन बँकेपासून रविकिरण सोसायटीपर्यंतचा डीपी रस्ता अतिक्रमण करणाºयांनी गिळंकृत केला आहे. त्याच्या जागेत संरक्षक भिंत उभारावी. त्याचे सीमांकन करावे. या रस्त्याचा प्रश्न २० वर्षांपासून प्रलंबित आहे. तेथे पंचवीसपेक्षा जास्त सोसायट्या असून नागरिकांना रस्ताच नसल्याने अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो, अशी समस्या नगरसेवकांनी मांडली.
स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या सभेत २७ गावांतील रस्त्यांचे सीमांकन करण्यास मंजुरी दिली आहे. त्याच रविकिरण सोसायटीकडे जाणाºया रस्त्याचे सीमांकन केले जाईल. तसेच रस्ता डीपीनुसार तातडीने तयार करण्यात येईल. रस्त्याच्या विकासाला आयुक्तांचे प्राधान्य आहे, असे आयुक्तांनी स्वत: स्पष्ट केले.
दरम्यान, नांदिवलीतून वाहणाºया दोन नाल्यांचा प्रवाह बंद करून त्यावर इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पावसाचे पाणी तुंबते. ही बाब देखील नगरसेवकांनी यावेळी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.

अतिक्रमण करणाºयांचे धाबे दणाणले
आयुक्तांच्या पाहणी दौºयामुळे रस्ता अडवणारे, अतिक्रमण करणाºयांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. नांदिवलीतील नगरसेवकांच्या तक्रारीची प्रशासनाकडून दखल का घेतली जात नाही, असाही प्रश्न आयुक्तांनी संबंधित अधिकाºयांना विचारला. झोपा काढू नका, नागरिकांच्या समस्या सोडवा, अशी कानउघाडणी आयुक्तांनी यावेळी केली.
 

Web Title: Kadmosi Commissioner's hometown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.