कलानी गटाचा भाजपला धक्का?; सात नगरसेवक संपर्काबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 04:05 AM2019-11-22T04:05:01+5:302019-11-22T04:05:17+5:30

उल्हासनगर महापौर निवडणूक; राजकीय हालचालींना वेग

Kalani group's BJP shocked ;; Seven councilors out of touch | कलानी गटाचा भाजपला धक्का?; सात नगरसेवक संपर्काबाहेर

कलानी गटाचा भाजपला धक्का?; सात नगरसेवक संपर्काबाहेर

Next

- सदानंद नाईक

उल्हासनगर : आधी महापौरपदावरून आणि नंतर आमदारकीवरून झुलवत ठेवत राजकीयदृष्ट्या कोंडी केलेल्या ओमी कलानी गटाने महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला साथ देत भाजपला धक्का देण्याची तयारी केल्याने सत्ताधारी भाजपच्या गोटात चिंता पसरली आहे. साई पक्षाच्या १० सदस्यांचे विलीनीकरण करून भाजपने कलानी गटाचा डाव उधळण्याची तयारी पूर्ण केली आहे. त्यानंतरही साई पक्षाचे जीवन इदनानी आणि एक नगरसेवक पक्षाची वेगळी चूल टिकवून आहेत. या तडजोडीच्या बदल्यात ईदनानी महापौर झाले, तरी ते पद साई पक्षाकडे जाते आणि शिवसेनेच्या लीलाबाई आशान महापौर झाल्या तर भाजपच्या हातातून पालिकेची सत्ता जाते, अशी चुरशीची स्थिती उल्हासनगरमध्ये निर्माण झाली आहे.

मनोज लासी या स्वीकृत नगरसेवकाचा राजीनामा घेत ओमी कलानी यांची समजूत काढण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत.
महापौरपदाची निवडणूक शुक्रवारी दुपारी १२ वाजता होईल. भाजपने जमनुदास पुरस्वानी आणि जीवन इदनानी यांना, तर शिवसेनेने लीलाबाई आशान यांना उमेदवारी दिली आहे. उपमहापौरपदासाठी भाजपकडून विजय पाटील व साई पक्षाचे टोनी सिरवानी, तर शिवसेनेकडून रिपाइंचे गटनेते भगवान भालेराव व राष्ट्रवादीचे गटनेते भरत गंगोत्री यांनी अर्ज भरला आहे.

संख्याबळाचे हेलकावे
बहुमतासाठी ४० नगरसेवकांची आवश्यकता आहे. महापालिकेत भाजपचे ३१, साई पक्षाचे १२ असे ४३ नगरसेवक आहेत. तर विरोधात शिवसेनेचे २५, राष्ट्रवादीचे ४, रिपाइंचे ३, काँगे्रस, भारिप व पीआरपी यांचे प्रत्येकी एक असे ३५ नगरसेवक आहेत. इदनानी यांनी महापौरपदाची अट घालत साई पक्ष भाजपमध्ये विलीन केला आहे. भाजपच्या ३१ नगरसेवकांपैकी ओमी कलानी गटाचे ११ नगरसेवक आहेत. ते फुटण्याची शक्यता असल्याने आणि त्यातील सात नगरसेवक संपर्कात नसल्याने भाजप नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या गटाने शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी केली असून तसे झाले, तर शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या ४६ होईल आणि भाजप समर्थकांची संख्या घटून ३२ होईल, असा विरोधकांचा दावा आहे.

सर्व नगरसेवक शहराबाहेर : महापौरपदाच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून सर्वच पक्षांचे नगरसेवक शहराबाहेर आहेत. ते थेट उद्या निवडणुकीवेळी सभागृहात हजर होणार आहेत.

Web Title: Kalani group's BJP shocked ;; Seven councilors out of touch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.