कळव्यातील घटना : आरोपींवरील बलात्काराचा गुन्हा रद्द होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2017 10:02 PM2017-07-25T22:02:52+5:302017-07-25T22:02:52+5:30

Kalava Rape Case | कळव्यातील घटना : आरोपींवरील बलात्काराचा गुन्हा रद्द होणार?

कळव्यातील घटना : आरोपींवरील बलात्काराचा गुन्हा रद्द होणार?

Next

 जितेंद्र कालेकर
 ठाणे, दि. 25 -  कळवा घोलाईनगर येथील महिलेवर झालेल्या कथित सामूहिक बलात्काराचा गुन्हा रद्द करण्याची शिफारस न्यायालयाकडे केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली. आपल्या १४ वर्षांच्या मुलीच्या सल्ल्याने या महिलेने बलात्काराचा बनाव केल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस आले आहेत.
रविवारी सायंकाळी झालेली ही कथित सामूहिक बलात्काराची घटना हा बनाव असल्याचे अवघ्या २४ तासांत पोलिसांनी उघड केले. या महिलेचे पती व्यंकटेश यांनी दीड वर्षापूर्वी कर्नाटकातील शिरसप्पाच्या पत्नीवर अ‍ॅसिड फेकल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात त्याला अटकही झाल्यामुुळे तो कारागृहात होता. त्याची दोनच महिन्यांपूर्वी जामिनावर सुटका झाली. शिरसप्पा व त्याचे साथीदार आपल्याला नव्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती व्यंकटेश याने पत्नीकडे बोलून दाखवली होती. आपले वडील व आई यांचे संभाषण त्यांच्या मुलीने ऐकले होते. त्यामुळे तिने बलात्काराचा बनाव करण्याची युक्ती आईला सुचवली होती.
शिरसप्पा व त्याच्या पाच साथीदारांनी आपल्यावर बलात्कार केला आणि आपल्यावर अ‍ॅसिड फेकल्याचा आरोप त्या महिलेने केला. मात्र तिच्या शरीरावरील अ‍ॅसिडची एक जखम सोडता अन्यत्र पोलिसांना कुठेही अ‍ॅसिड सापडले नाही. तसेच बलात्कार करणाºयांची नावे सांगताना तिची मुलगी आणि मुलगा यांच्या जबाबामध्ये विसंगती आढळली. ज्यांनी बलात्कार केला असे सांगितले ते तेलंगणामध्ये असल्याचे निष्पन्न झाले व इतक्या कमी कालावधीत तेथे पोहोचणे अशक्य होते.
 
वैद्यकीय तपासणी बलात्काराचे पुरावे नाही
बलात्काराचा आरोप करणाऱ्या या महिलेच्या वैद्यकीय तपासणीमध्येही शरीर संबंधाबाबतच्या खुणा आढळलेल्या नाहीत.  त्यामुळे परिस्थितीजन्य पुराव्यांना वैद्यकीय अहवालाची जोड लाभली आहे.
 
तिघांचे जबाब नोंदविणार 
कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पवार यांचे एक पथक तेलंगणातील तीन कथित आरोपींचा जबाब नोंदवण्यासाठी गेले आहे. त्यांचा जबाब नोंदवल्यानंतर इतर सर्व बाजूंची पडताळणी करुन बलात्काराचा गुन्हाच रद्द करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचेही एका वरीष्ठ पोलीस अधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Kalava Rape Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.