अर्ध मॅरेथॉन कलीम, सीमाने मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 01:37 AM2019-11-26T01:37:42+5:302019-11-26T01:38:00+5:30

डेकेथलॉन स्पोर्ट्स क्लब आणि जॉइंट अनमोशन आयोजित २१ किलोमीटर अंतराच्या डेकेथलॉन अर्धमॅरेथॉन स्पर्धेत १८ ते ३५ वर्षे वयोगटांतील महिलांच्या शर्यतीत सीमा दासीलने, तर पुरु षांमध्ये कलीम चौधरी याने बाजी मारली.

Kaleem & Seema win the Half marathon | अर्ध मॅरेथॉन कलीम, सीमाने मारली बाजी

अर्ध मॅरेथॉन कलीम, सीमाने मारली बाजी

googlenewsNext

ठाणे - डेकेथलॉन स्पोर्ट्स क्लब आणि जॉइंट अनमोशन आयोजित २१ किलोमीटर अंतराच्या डेकेथलॉन अर्धमॅरेथॉन स्पर्धेत १८ ते ३५ वर्षे वयोगटांतील महिलांच्या शर्यतीत सीमा दासीलने, तर पुरु षांमध्ये कलीम चौधरी याने बाजी मारली. महिलांच्या गटात सीमासमोर आव्हान उभे करण्यात इतर धावपटूंना यश आले नाही. सीमा यांनी २१ किलोमीटरचे अंतर एक तास ५५ मिनिटे ५५ सेकंदांत धावून पूर्ण केले. पुरुषांच्या गटात कलीमने २१ किलोमीटरचे अंतर एक तास २९ मिनिटे ४९ सेकंदात पार केले.

पाच, १० आणि २१ किलोमीटरच्या शर्यतीत तीन वयोगटांत या स्पर्धा ठाण्यात पार पडल्या. त्यामध्ये महिलांच्या २१ किलोमीटर शर्यतीत सीमा दासील यांच्यापाठोपाठ दुसऱ्या स्थानी आलेल्या सुनीता दाशूनने हे अंतर पार करण्यासाठी दोन तास १४ मिनिटे ३६ सेकंद एवढा वेळ घेतला.

महिला गटाच्या तुलनेत अव्वल आलेल्या कलीमला मात्र यावेळी अतिशय कडव्या चुरशीला सामोरे जावे लागले. कलीमने २१ किलोमीटरचे अंतर पार करताना एक तास २९ मिनिटे ४९ सेकंद अशी वेळ नोंदवल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कलीमला आव्हान देणाºया शंकर गोपालने एक तास ३० मिनिटे ३७ सेकंद अशा कामगिरीसह दुसरे स्थान मिळवले. अमितकुमार यादवने हेच अंतर एक तास ३१ मिनिटे ५४ सेकंद अशी वेळ नोंदवत तिसरे स्थान पटकावले.

स्पर्धेतील इतर निकाल
३६ ते ५० वर्षे वयोगट :
महिला : सयुरी दळवी (एक तास ४७ मिनिटे २२ सेकंद), कोयल सिंग (दोन तास २० मिनिटे ४१ सेकंद), शालिनी अरोरा (दोन तास २२ मिनिटे १८ सेकंद).
पुरु ष : तानाजी पाटील (एक तास ३९ मिनिटे ३१ सेकंद), झुबेर खान (एक तास ४२ मिनिटे ३ सेकंद), रिझवान मराईकर (एक तास ५५ मिनिटे १४ सेकंद)
५० वर्षे आणि पुढे : महिला : सुजाता सुधींद्र (दोन तास ३२ मिनिटे ४० सेकंद
पुरु ष : अजय भट (एक तास ४४ मिनिटे), फिलिप ग्लुकमन (एक तास ५५ मिनिटे २ सेकंद), राम मोहनदास (दोन तास १ मिनिटे ३७ सेकंद)

Web Title: Kaleem & Seema win the Half marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.