ठाण्यातील अभिनय कट्टयावर काळू बाळूची धम्माल, एकपात्री खिडकीची कमाल सादर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 04:01 PM2018-06-11T16:01:22+5:302018-06-11T16:01:22+5:30

रविवारी ३८० क्रमांकाच्या अभिनय कट्ट्यावर 'खिडकी" या एकपात्रीचे व त्याचबरोबर "काळू बाळू" या धम्माल विनोदी द्विपात्री व विविध एकपात्रीचे देखील सादरीकरण झाले. 

Kallu Baloo Dhummal and Ek Bandhani Kanyakali, the highest performance in Thane | ठाण्यातील अभिनय कट्टयावर काळू बाळूची धम्माल, एकपात्री खिडकीची कमाल सादर 

ठाण्यातील अभिनय कट्टयावर काळू बाळूची धम्माल, एकपात्री खिडकीची कमाल सादर 

Next
ठळक मुद्देअभिनय कट्टयावर काळू बाळूची धम्मालएकपात्री खिडकीची कमाल सादर नाट्य चित्रपटसृष्टीतील मान्यवरांना कलेच्या माध्यमातून मानवंदना

ठाणे : अभिनय कट्ट्यावर आजपर्यंत साहित्य नाट्य चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांना कलेच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली आहे. कट्टा क्रमांक ३८० सुद्धा विशेष ठरला कारण महाराष्टरातील लोककलेतील विक्रमी विनोदवीरांची जोडगोळी 'काळू-बाळू ' विनोदाच्या तुफानासोबत कट्ट्यावर अवतरली. 

        काळू बाळू म्हणजे महाराष्ट्रातील लोककलेची शान तमाशाचा प्राण अशा या जोड गोळीने अख्ख्या मराठी रसिकमनावर निर्विवाद अधिराज्य गाजवलं अशाच काळू बाळू च्या कलाकृतीला पुन्हा एकवार रसिक मायबापासमोर आणायचा प्रयत्न अभिनय कट्टयाने केला.प्रशांत सकपाळ(बाळू) व नवनाथ कंचार (काळू) ह्या विनोदवीरांनी "काळू -बाळू" सादर करीत रसिकांमध्ये हशा पिकवला .प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात दोघांचेही स्वागत केले.   दोघांचेही भन्नाट टायमिंग संवादफेक हजरजबाबीपणा व चेहऱ्यावरील हावभाव पाहून जणू काळू बाळू कट्ट्यावर अवतरले अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांमध्ये उमटली. तत्पूर्वी कट्ट्याची सुरुवात प्रेक्षक प्रतिनिधी प्रभाकर सुळे ह्यांच्याहस्ते दीप प्रज्वलनाने  झाली . त्यांनतर आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगी शिवाजी महाराजांनी संभाजीच्या  मृत्यूची अफवा पसरवली होती त्या बातमीची महाराणी येसूबाईच्या कोवळ्या मनावर उमटलेल्या भावविश्वाचे सादरीकरण साई कदम हिने एकपात्री प्रयोगाने सादर केले .सहदेव कोलंबकर ह्याने सादर केलेला पर्यावरणाची काळजी घ्या सांगणारा विदूषक प्रेक्षकांची विशेष दादा मिळवून गेला.  कट्टा क्रमांक ३८० चे आणखी एक आकर्षण म्हणजे गीता सुळे ह्यांनी सादर केलेला एकपात्री प्रयोग  ' खिडकी '. प्रेक्षकांच्या मनातील खिडकी खोलून त्यांनी आपल्या आयुष्यातील 'खिडकी' व मानवी मनाचं भावविश्व् प्रेक्षकांसमोर अलगद उलगडून दाखवलं .बालंपण तारुण्य म्हातारपण प्रत्येकवेळी आपलं आणि खिडकीच नातं वेगवेगळ्या रूपात असत तसेच आई मुलगा , नवरा बायको , ह्या नात्यांचं आणि खिडकीच नातं , प्रेम बहरवणारी खिडकी.एकटेपण विसरायला लावणारी, हवीहवीशी प्रेयसीची खिडकी , बदनाम असलेली वेश्येच्या कोठीची खिडकी मनास हात घालून गेली ,अनेक नात्याना वेगळी ओळख निर्माण करून देणारी खिडकी , अशा  अनेक भावविश्वातून फेरफटका मारल्यावर २६ /११ च्या आक्रोशातही देशाभिमानाने परकीय आक्रमणाविरुद्ध एकतेचं प्रतीक म्हणून उभी राहिलेली ताज आणि ओबेरॉय ची खिडकी  मनात देशप्रेमाची भावना जागवून गेली.गीता सुळे ह्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला  प्रेक्षकांच्या टाळ्यांची जोड मिळत होती कारण प्रेक्षकांना प्रत्येक भूमिका  स्वतःच्या मनाच्या जवळची वाटून जात होती. अशा प्रकारे कट्टा क्रमांक ३८० विविध रंगी  एकपात्री आणि द्विपात्रीच्या सादरीकरणाने संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे निवेदन कल्पेश डुकरे ह्याने केले.

Web Title: Kallu Baloo Dhummal and Ek Bandhani Kanyakali, the highest performance in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.