कळवा-ऐरोली एलिव्हेटेड मार्गाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 02:23 AM2018-08-11T02:23:26+5:302018-08-11T02:25:04+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी भूमिपुजन झालेल्या कळवा-ऐरोली या महत्त्वाकांक्षी एलिव्हेटेड नवीन रेल्वेमार्गाचे काम अद्याप मार्गी लागले नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

Kalva-Airli elevated road work stopped | कळवा-ऐरोली एलिव्हेटेड मार्गाचे काम रखडले

कळवा-ऐरोली एलिव्हेटेड मार्गाचे काम रखडले

Next

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी भूमिपुजन झालेल्या कळवा-ऐरोली या महत्त्वाकांक्षी एलिव्हेटेड नवीन रेल्वेमार्गाचे काम अद्याप मार्गी लागले नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे ठाणे रेल्वेस्थानकातील प्रवाशांचा भार दिवसेंदिवस वाढतच आहे.
कळवा-ऐरोली या महत्त्वाकांक्षी एलिव्हेटेड नवीन रेल्वेमार्गाचा ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी पाठपुरावा केला. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २०१५ च्या रेल्वे बजेटमध्ये या प्रकल्पासाठी ४२८ कोटी रूपये मंजूर केले होते. त्यानुसार या प्रकल्पाचे भूमिपूजन डिसेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र दोन वर्षे उलटूनही या प्रकल्पाचे काम मार्गी लागलेले नाही. या प्रकल्पासाठी मंजूर झालेला निधी परत जाऊ नये, यासाठी त्यांनी या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत करून पहिल्या टप्प्यात दिघा स्टेशनचे काम सुरू करून घेतले. दुसऱ्या टप्प्यात बाधित होणाºया झोपड्यांचे पुनर्वसन एमएमआरडीए खात्याकडून न झाल्याने प्रकल्पाचे काम रखडले आहे. यासंदर्भात विचारे यांनी मुख्यमंत्र्यांची वारंवार भेट घेऊन पत्रव्यवहार केला आहे. मात्र पुनर्वसनाचे आदेश एमएमआरडीएला मिळाले नसल्याने हे काम रखडले आहे. राज्य शासनास हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र शासनाने आदेश द्यावे, अशी मागणी विचारे यांनी संसदेमध्ये केली होती.
>दिघा रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी ५५ कोटी
या प्रकल्पात कल्याण डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई शहराच्या विकासात महत्त्वाचा वाटा असलेल्या कळवा-ऐरोली उन्नतमार्गासह दिघा रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. दिघा स्थानक उभारणीसाठीही रेल विकास महामंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत. या स्थानकाच्या उभारणीसाठी रेल्वे पहिल्या टप्प्यात ५५ कोटी रु पये खर्च करणार आहे. सध्या ठाण्यानंतर ऐरोली हे स्थानक आहे. या दोन्ही स्थानकांतील अंतर ५.७६ किमी आहे. रेतीबंदरनजीकचा उन्नतमार्ग आणि
दिघा रेल्वेस्थानक हे दोन्ही प्रकल्प कळवा-ऐरोली या ४२८ कोटींच्या उन्नतमार्गाचाच भाग आहे. दिघा रेल्वेस्थानक येत्या तीन वर्षात उभे करण्याचा रेल्वेचा मानस आहे. त्यासाठी जागतिक बँकेकडे रेल्वे विकास महामंडळाने कर्जही मागितले आहे. पंतप्रधानानी दोन वर्षांपूर्वी या मार्गाचे भूमिपूजन करूनही या मार्गातील जमीन संपादन, झोपड्यांचे पुनर्वसन रखडले आहे. एमएमआरडीएची जबाबादारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. मात्र, तरीही मोदींनी भूमिपूजन केलेला प्रकल्प दोन वर्षे रखडलेला असल्याने कल्याण-नवी मुंबई मार्गावर प्रवास करणाºया प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा उन्नत मार्ग झाल्यास ठाणे स्थानकावरील
ताण कमी होणार आहे.

Web Title: Kalva-Airli elevated road work stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.