कळवा, मुंब्य्रासाठी ब्रिटिशकालीन धरण

By Admin | Published: March 13, 2016 02:35 AM2016-03-13T02:35:14+5:302016-03-13T02:35:14+5:30

कळवा-मुंब्य्रातील नागरिकांना सध्या ६० तास पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी आंदोलने सुरू आहेत. या पाणीसमस्येवर मात करण्यासाठी मागील कित्येक वर्षांपासून कळवा

Kalwa, British dam for Mumbra | कळवा, मुंब्य्रासाठी ब्रिटिशकालीन धरण

कळवा, मुंब्य्रासाठी ब्रिटिशकालीन धरण

googlenewsNext

अजित मांडके, ठाणे
कळवा-मुंब्य्रातील नागरिकांना सध्या ६० तास पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी आंदोलने सुरू आहेत. या पाणीसमस्येवर मात करण्यासाठी मागील कित्येक वर्षांपासून कळवा आणि रबाळेदरम्यान पारसिक पुलामागे असलेले धरण उपयोगात आणण्याबाबत आता ठाणे महापालिका आणि रेल्वे विभागाकडे मागणी करण्यात येत आहे.
या धरणाच्या जमिनीची मालकी रेल्वेकडे आहे. त्याच्या ताब्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे. या धरणाला डी धरण म्हणून संबोधले जाते. इंग्रजांच्या काळात जेव्हा रेल्वे ट्रॅक हा ठाण्याच्या पुढे न्यायचा होता, त्या वेळी येथे डोंगर पोखरून दोन मोठे बोगदे तयार करण्याचे काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेरून मजूर आणले गेले होते. या मजुरांच्या पाण्याचा प्रश्न कायम होता, तेव्हा त्यांच्याकरिता हे डी धरण बांधले. त्याच्या तीनही बाजूंनी डोंगर असून जाण्यासाठी एक रस्ता आहे. परिणामी, तिन्ही डोंगरांवरून पावसाळ्यात वाहत येणारे पाणी या धरणात साठवले जाते. त्याचा वापर वर्षभर करता येऊ शकतो.
ते गृहीत धरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका अशरीन राऊत यांनी ठाणे महापालिकेला एक पत्र लिहून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
> या धरणातील पाणी कळवा, मुंब्य्रातील रहिवाशांना मिळावे, यासाठी पालकमंत्र्यांबरोबर चर्चा झाली होती. त्यानंतर, त्यांनी धरणाची पाहणी करून पुढील धोरण ठरविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत.
- शैलेश पाटील, नगरसेवक, मनसे

Web Title: Kalwa, British dam for Mumbra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.