कळवा रुग्णालयात डॉक्टरांची निवासी डॉक्टरांना मारहाण
By अजित मांडके | Published: January 5, 2024 08:39 PM2024-01-05T20:39:37+5:302024-01-05T20:39:54+5:30
निवासी डॉक्टरांचा शनिवारी काम बंदचा इशारा
ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील शस्त्रक्रिया विभागात काम करणाऱ्या रुग्णालय संलग्न वैदेकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टराला व्यवस्थित काम करीत नसल्याचा जाब विचारत अस्थिव्यंग विभागातील वरिष्ठ डॉक्टरानीमारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली.
रुग्णालयात वैदेकीय विद्यालयात पदवी पूर्ण झाल्यावर एक वर्षाच्या करारानुसार हे डॉक्टर निवासी डॉक्टर म्हणून सेवा बजावत असतात यावेळी रुग्णालयातील ओपिडी पासून अनेक वॉर्डची जबाबदारी त्यांच्यावर असते. शुक्रवारी एका निवासी डॉक्टर बरोबर काम करताना बाचाबाची होऊन वरिष्ठ डॉक्टरांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.
निवासी डॉक्टरांचा शनिवारी काम बंदचा इशारा
वैदेकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी व निवासी डॉक्टर यांनी झालेल्या घटनेचा निषेध करीत शनिवारी सकाळी साडेआठ वाजता कामबंद करून निषेध आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात रुग्णालयाचे डीन यांना प्राथमिक अहवाल पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. अहवाल प्राप्त होताच संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल. - अभिजित बांगर, आयुक्त, ठामपा