ठाण्यातील कळवा, मुंब्रा खाडीत अनधिकृत रेती उत्खनन करणार्यांवर धडक कारवाई!

By सुरेश लोखंडे | Published: September 2, 2024 10:44 PM2024-09-02T22:44:21+5:302024-09-02T22:45:36+5:30

खाडी पात्रामध्ये अनधिकृत रेती उत्खनन करणारी अंदाजे १५ ब्रास रेतीने भरलेली एक बार्ज तसेच एक सक्शन पंप आढळून आला.

kalwa in thane action taken against unauthorized sand miners in mumbra bay | ठाण्यातील कळवा, मुंब्रा खाडीत अनधिकृत रेती उत्खनन करणार्यांवर धडक कारवाई!

ठाण्यातील कळवा, मुंब्रा खाडीत अनधिकृत रेती उत्खनन करणार्यांवर धडक कारवाई!

सुरेश लोखंडे, ठाणे : मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये आणि प्रांताधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे तहसीलदार कार्यालयाचे पथक प्रमुख निवासी नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांच्यासह मुंब्रा मंडळ अधिकारी व मंडळातील सर्व तलाठी यांनी मुंब्रा ते कल्याण दरम्यान रेल्वे ट्रॅकजवळ होणाऱ्या अनधिकृत रेती उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी आज बोटीद्वारे गस्त घातली असता, खाडी पात्रामध्ये अनधिकृत रेती उत्खनन करणारी अंदाजे १५ ब्रास रेतीने भरलेली एक बार्ज तसेच एक सक्शन पंप आढळून आला.

तर अशाच प्रकारच्या दुसऱ्या कारवाईत खाडीपात्रामध्ये अनधिकृत रेती उत्खनन करणारी अंदाजे १३ ब्रास रेतीने भरलेली दुसरी बार्ज तसेच एक सक्शन पंप कळवा बाळकुम खाडीत आढळून आले. परंतु हे बार्ज व सक्शन पंप खाडीपात्रातून बाहेर काढता येत नसल्याने बार्ज व सक्शन पंप जाळून खाडीमध्ये बुडवून नष्ट करण्यात आले असून यापुढील कायदेशीर कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Web Title: kalwa in thane action taken against unauthorized sand miners in mumbra bay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.