कळवा-मुंब्रा, दिवावासीयांना मिळणार अखंडित वीज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 01:10 AM2019-07-18T01:10:59+5:302019-07-18T01:11:07+5:30

कळवा आणि मुंब्रा-दिवावासीयांना वारंवार खंडित होणाऱ्या वीजसमस्येला सामोरे जावे लागते.

Kalwa-Mumbra, Divas will get uninterrupted power | कळवा-मुंब्रा, दिवावासीयांना मिळणार अखंडित वीज

कळवा-मुंब्रा, दिवावासीयांना मिळणार अखंडित वीज

Next

ठाणे : कळवा आणि मुंब्रा-दिवावासीयांना वारंवार खंडित होणाऱ्या वीजसमस्येला सामोरे जावे लागते. त्यावर उपाय म्हणून या भागात आता टोरंटमार्फत वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला काही स्थानिक नेत्यांचा विरोध असला तरीसुद्धा भिवंडीत यशस्वी झालेला टोरंटचा फॉर्म्युला या भागातही यशस्वी करण्यासाठी ही यंत्रणा सज्ज झाली आहे. कळवा आणि मुंब्रा, दिवा विभागात भिवंडीसारखीच यंत्रणा राबवून अखंड वीजपुरवठा तोही महावितरणच्या दरानुसारच करण्याची ग्वाही टोरंट पॉवर कंपनीने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे राजकीय मंडळींचेही अवसान गळाले आहे.
मागील काही महिन्यांपासून टोरंट हटावसाठी नारा दिला जात आहे. यामध्ये राजकीय मंडळींनी रस्त्यावर उतरून आंदोलनेही केली आहेत. परंतु,त्यानंतरही राज्य शासनाने टोरंटला या भागात परवानगी दिली असून त्यांचे कार्यालयसुद्धा सुरू झाले आहे. या यंत्रणेमुळे या भागातील वीजचोरी, विजेची तूट यामुळे महावितरणचे प्रचंड नुकसान होत होते. त्यामुळेच राज्य शासनाने येथील विजेचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला. वीजवितरण आणि वीजबिलवसुलीचे कंत्राट निविदा सूचनेद्वारे देण्याचे जाहीर केले. त्यानुसार हे कंत्राट टोरंट पॉवर या खाजगी कंपनीला दिले.
>भिवंडीतील तूट ६० वरून १५ टक्क्यांवर
१२ वर्षांपूर्वी भिवंडीत एमएसईबीची वीजतूट ६० टक्क्यांवर होती. आज हे प्रमाण १५ टक्क्यांवर आले आहे. आजपर्यंत टोरंटने नेटवर्क आणि सुविधांसाठी ६०० कोटी रु पयांची गुंतवणूक भिवंडीत केली आहे. भिवंडी शहर एमईआरसीच्या गुणांमध्ये ड श्रेणीमध्ये होते, ते आता ब श्रेणीमध्ये आले आहे. भिवंडीत जी पूर्वी परिस्थिती होती, ती आता कळवा, मुंब्रा, दिवा विभागांत आहे. खाजगीकरणानंतर अतिशय नियोजनबद्धपणे अखंडित वीज देण्याची ग्वाही कंपनीने दिली आहे.

Web Title: Kalwa-Mumbra, Divas will get uninterrupted power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.