Kalyan: लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोघांना २० वर्षे सश्रम कारावास, कल्याण न्यायालयाचा निकाल
By सचिन सागरे | Published: June 7, 2023 08:25 PM2023-06-07T20:25:24+5:302023-06-07T20:26:22+5:30
Crime News: एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अजमत छोटन अली शेख (२८) व खुर्शीद महंमदइदी आलम शेख (३०) या दोघांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. ए. डी. हर्णे यांनी बुधवारी २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
- सचिन सागरे
कल्याण : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अजमत छोटन अली शेख (२८) व खुर्शीद महंमदइदी आलम शेख (३०) या दोघांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. ए. डी. हर्णे यांनी बुधवारी २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी पीडिता नैसर्गिक विधी करून घराच्या दिशेने जात होती. त्यावेळी, अजमत व खुर्शीद या दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर, घडला प्रकार कोणाला सांगितला तर मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अजमत व खुर्शीद या दोघांना पोलिसांनी अटक केली. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक निलेश व्ही. पाटील यांनी कल्याण न्यायालयात आरोपपत्र सादर केले. सहायक सरकारी वकील म्हणून अश्विनी भामरे-पाटील व जयश्री बठेजा यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी पोलीस हवालदार ए. आर. गोगरकर यांनी त्यांना मदत केली.
--