Kalyan: जितेंद्र आव्हाड यांच्या त्या वक्तव्यानंतर शिवसेना आणि भाजप आक्रमक

By मुरलीधर भवार | Published: January 4, 2024 03:14 PM2024-01-04T15:14:38+5:302024-01-04T15:17:03+5:30

Kalynan News: जितेंद्र आव्हाड हे काहीही बरळतात. एका विशिष्ट वर्गाची मते घेण्यासाठी हिंदू देवदेवता बद्दल काही बोलतात. श्रीराम हे मांसाहारी होते. याचा पुरावा त्यांनी द्यावा असे आव्हान शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे.

Kalyan: After Jitendra Awad's statement, Shiv Sena and BJP are aggressive | Kalyan: जितेंद्र आव्हाड यांच्या त्या वक्तव्यानंतर शिवसेना आणि भाजप आक्रमक

Kalyan: जितेंद्र आव्हाड यांच्या त्या वक्तव्यानंतर शिवसेना आणि भाजप आक्रमक

- मुरलीधर भवार 
कल्याण - जितेंद्र आव्हाड हे काहीही बरळतात. एका विशिष्ट वर्गाची मते घेण्यासाठी हिंदू देवदेवता बद्दल काही बोलतात. श्रीराम हे मांसाहारी होते. याचा पुरावा त्यांनी द्यावा असे आव्हान शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांच्यावर टिका केली आहे. मुघल आणि अफजल खान जितेंद्र आव्हाड यांचे दैवते आहेत.त्यांनी मुघल आणि अफझल खानाचा अभ्यास न करता श्रीराम आणि देवांचे पोथी पुराण वाचावे असा सल्ला दिला आहे.

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यावर राज्यभरात त्यांच्याविरोधात टिका केली जात आहे. कल्याणमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी देखील  आव्हाड यांच्यावर सडेतोड टिका केली आहे. कल्याण पश्चिमेचे शिवसेना आमदार भोईर यांनी सांगितले की, जितेंद्र काहीही बरळतात. एका विशिष्ट वर्गाची मते घेण्यासठी हिंदू देवदेवतांविषयी बोलता. श्रीराम हे मांसाहारी होते. याचा त्यांनी पुरावा देऊन त्यांनी सिद्ध करावे. आव्हाड यांनी वयाचे तारतम्य बाळगावे. उगाचच एका वर्गाच्या भावना भडकविण्याचे काम करु नये. इतकेच नाही तर भाजप आमदार गायकवाड यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांच्यावर टिका केली आहे. महाराष्ट्र ही साधू संताची भूमी आहे. त्या भूमीमध्ये श्रीरामांचा किंवा देवी देवींताचा इतिहास आणि भक्तीविषयी काही माहिती नाही. आव्हाड यांना फक्त मुघल आणि अफजल खानाबद्दल माहिती आहे. अफजल खान हे आव्हाडांचे दैवत आहे. श्रीरामाविषयी माहिती नसेल. त्यांनी तो अभ्यास करावा. आपण महाराष्ट्रात आणि भारत देशात राहत आहात. थोकडा त्याचाही अभ्यास करावा. फक्त मुघलांचा आणि अफजलखानाचा अभ्यास करु नये. देवांची पोथी पुराणे ग्रंथ वाचावेत असा सल्ला गायकवाड यांनी आव्हाड यांना दिला आहे.

Web Title: Kalyan: After Jitendra Awad's statement, Shiv Sena and BJP are aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.