विलंबामुळे कल्याण- अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग ठरतोय जीवघेणा; खड्यात झोपून आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 06:47 PM2023-01-10T18:47:15+5:302023-01-10T18:51:36+5:30

वाहतुकीसाठी उपयुक्त असलेला कल्याण- नगर राष्टÑीय महामार्गाचे बांधकाम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे.

Kalyan-Ahmednagar National Highway is becoming life threatening due to delay; Agitation by sleeping in the rocks | विलंबामुळे कल्याण- अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग ठरतोय जीवघेणा; खड्यात झोपून आंदोलन

विलंबामुळे कल्याण- अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग ठरतोय जीवघेणा; खड्यात झोपून आंदोलन

googlenewsNext

राजेश जाधव

ठाणे/म्हारळ : वाहतुकीसाठी उपयुक्त असलेला कल्याण- नगर राष्टÑीय महामार्गाचे बांधकाम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे.ठिकठिकाणी अडथळे असून त्यासाठी सुरक्षिततेचे नियमही पायदळी तुडवले. काँक्रेटमधील सळ्या उघड्या असून त्यावर रोज १५ ते २० दुचाकी गाड्या स्लिप होऊन जीव घेणे अपघाताला या महामार्गावरील म्हारळगांव,पाडा, वरप, कांबा आणि पाचवा मैल येथील रहिवाश्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्याविरोधात येथील सेक्रट हार्ट स्कूलचे प्रिसिपल अलबीन अ‍ॅथॉनी यांनी रोडवर झोपून तीव्र आंदोलन केले.

कूर्मगतीने सुरू असलेल्या या महामार्गावर म्हारळगांव, पाडा, वरप, कांबा ते पाचवा मैल दरम्यान काँक्रटीकरणाचे काम सुरू आहे. अवघ्या साडेतीन किलोमीटरचे हे काम तुकड्या तुकड्यात सुरू आहे. त्यामुळे जीव घेणी वाहतूक कोंडी होऊन अपघात होत आहेत.  कॉंक्रिटीकरणच्या कामासाठी सुरक्षतचे नियम पायतळी तुडवण्यात येत आहे.  ठेकेदार व महामार्ग बांधकाम विभागाकडून कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे या काँक्रिटीकरणचे काम जीवघेणे ठरत आहे. या काँक्रीट मधील सळ्या (डॉवेल ) बाहेर असून टँकरने पाणी टाकले जात आहे.

या पाण्यामुळे रस्ता निसरडा होत असून त्यावर वाहनांसह दुचाकींचे अपघात होत आहे. गुळगुळीत रस्त्यावर रोड रोलर फिरून तो आणखी जीवघेणा केल्याचे त्रस्त वाहन चालकांकडून सांगितले जात आहे.     वरप येथील सेक्रट हार्ट या शाळेचा विद्यार्थी आईसोबत स्कुटीवरून जात असताना त्यांचा अपघात झाला. नशीब बलवत्तर म्हणून ते बचावले. त्यामुळे संताप्त होऊन या शाळेचे मुख्याध्यापक अल्बिन अँथोनी, पालक विवेक गंबीरराव, अश्विन भोईर आदींनी मंगळवारी या महामार्गावरील खड्यात झोकून देत तीव्र आंदोलन केले.

या दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना रोखले. या रस्त्यावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. मात्र तक्रारी अभावी आम्ही काही करू शकत नसल्याचे पोलिस अधिकारी ऐकवत आहे. या कामामुळे व्यापारी, रिक्षा, टॅक्सी चालकांचे नुकसान होत असून परिसरात धुळीमुळे ग्रामस्थ, वाहनचालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे

Web Title: Kalyan-Ahmednagar National Highway is becoming life threatening due to delay; Agitation by sleeping in the rocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे