कल्याण, डोंबिवलीसह ग्रामीण भागात दोन हजार ७२० पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:37 AM2019-08-08T00:37:03+5:302019-08-08T00:37:05+5:30

पूरग्रस्तांची संख्या जवळपास तीन लाख

Kalyan, Dombivali and 2 thousand 5 panchanas in rural areas | कल्याण, डोंबिवलीसह ग्रामीण भागात दोन हजार ७२० पंचनामे

कल्याण, डोंबिवलीसह ग्रामीण भागात दोन हजार ७२० पंचनामे

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवलीसह ग्रामीण भागाला पुराचा मोठा फटका बसला. हजारो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. या सर्व घरांचे नुकसान किती झाले, याचे पंचनामे कल्याण तहसील कार्यालयातर्फे सध्या सुरू आहेत. पाचही मंडळ कार्यालयांतर्फे आतापर्यंत दोन हजार ७२० घरांचे पंचनामे कल्याण तहसील कार्यालयाकडून करण्यात आलेले आहेत. प्रत्यक्षात पूरग्रस्तांची संख्या सुमारे तीन लाखांच्या घरात आहे. पंचनामे करण्याचे काम अद्याप सुरूच आहे. पंचनाम्यांपश्चात सरकारकडून मदत मिळणार की नाही, याविषयी पूरग्रस्तांच्या मनात साशंकता आहे.

कल्याण-डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढल्याने उल्हास नदी, कल्याण खाडी, वालधुनी नदी यांच्या किनाऱ्यांसह सखल भाग पुराच्या पाण्याने वेढला गेला. २६ जुलै रोजी झालेल्या पावसाचा जोरदार फटका अनेकांना बसला. २७ आणि २८ जुलै रोजीच्या पुराने घरात घुसलेले पाणी ओसरलेले नव्हते. त्यानंतर, दोन दिवसांनी मुरबाडला एका कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांना भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर कल्याण तहसीलदार कार्यालयाने पूरग्रस्तांचे पंचनामे सुरू केले. हे पंचनामे सुरू करण्यासाठी सरकारकडून एक परिपत्रक काढण्यात आले. त्यात दोन दिवस पुराचे पाणी ज्यांच्या घरात होते, तसेच जी घरे अधिकृत आहे, त्याच घरांना मदत दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. तहसील कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, २७ आणि २८ तसेच ४ आणि ५ जुलै रोजी पुराचा फटका ज्या घरांना बसला आहे, त्या घरांचे पंचनामे करण्यात आले आहेत. हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, आतापर्यंत दोन हजार ७२० पंचनामे तहसील कार्यालयाकडून तयार करण्यात आले आहेत. हे पंचनामे सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवले जातील. त्यानंतर, सरकारकडून त्यांना मदत दिली जाईल. मदतीची रक्कम पाच ते सहा हजार रुपये ठरवली आहे. ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, त्यांचे संसार पाच ते सहा हजार रुपयांत उभे राहणार नाहीत. नुकसानीचा आकडा जास्त असून त्यातुलनेत मदतीची रक्कम तुटपुंजी आहे. मदतीच्या रकमेत वाढ करण्याची मागणी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

अधिकृत घरांनाच मदत मिळणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले असले तरी, तहसीलदारांकडून सरसकट सर्वांचेच पंचनामे केले जात आहेत. त्यानंतर, त्यांचे वर्गीकरण केले जाणार आहे. मदत कोणाला द्यायची आणि नाकारायची, हा धोरणात्मक निर्णय असल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. सरकारच्या या परिपत्रकामुळे बेकायदा घरांना मदत मिळणार नाही. त्यामुळे तहसीलदारांकडून आतापर्यंत दोन हजार ७२० एवढेच पंचनामे करण्यात आले आहेत.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीला पुराच्या पाण्याचा जबरदस्त फटका बसला. त्यात १४०० व्यापाऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यांंचे पंचनामे करण्याची मागणी बाजार समितीचे सभापती कपिल थळे यांनी केली होती. त्यानुसार, तहसीलदार कार्यालयाकडून ४०० व्यापाºयांचे पंचनामे केले आहेत. कल्याण, डोंबिवली व ग्रामीण भागात तीन लाखांपेक्षा जास्त पूरग्रस्त आहेत. त्यामुळे पंचनाम्यांचा आकडा व बाधितांची संख्या हे प्रमाण व्यस्त दिसून येत आहे.

जी घरे पाण्याखाली पूर्णपणे बुडाली होती, त्यांच्या घरातील विजेचे मीटर नादुरुस्त झालेले आहे. हे मीटर पाणी ओसल्यावर बदलून देण्यात यावे, यासाठी नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे धाव घेतली असता, मीटर बदलून देण्यासाठी शुल्क आकारले जात आहेत. मीटर बदलून देण्याकरिता पैसे आकारले जाऊ नये. ते मीटर मोफत बदलून द्यावेत, अशी मागणी माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.

पालकमंत्र्यांनी बुधवारी हा विषय मंत्रालयाच्या बैठकीत चर्चेला घेतला. त्यावेळी पैसे न घेता मीटर बदलून देण्याचे आदेश वीज वितरण विभागाला दिल्याची माहिती देवळेकर यांनी दिली. कल्याण तहसील कार्यालयाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच ४ आणि ५ जुलै रोजी पुन्हा पावसाने कहर केला. मुसळधार पावसाने तोच परिसर पुन्हा पाण्याखाली बुडाला. अवघ्या आठ दिवसांआधीच्या पुरातून सावरण्याआधीच अनेकांची घरे पुन्हा पाण्याखाली गेली.

Web Title: Kalyan, Dombivali and 2 thousand 5 panchanas in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.