कोणत्याही रोगावर कल्याण-डोंबिवलीत झटपट इलाज

By admin | Published: January 21, 2016 02:36 AM2016-01-21T02:36:06+5:302016-01-21T02:36:06+5:30

एकीकडे केबलवरून मंत्र-तंत्र, जादूटोणा, वशीकरणाच्या जाहिरातींचा मारा सुरू असतानाच कल्याण-डोंबिवलीत सर्दी-तापापासून गुप्तरोग

Kalyan-Dombivali Instant Treatment on Any Disease | कोणत्याही रोगावर कल्याण-डोंबिवलीत झटपट इलाज

कोणत्याही रोगावर कल्याण-डोंबिवलीत झटपट इलाज

Next

आकाश गायकवाड, डोंबिवली
एकीकडे केबलवरून मंत्र-तंत्र, जादूटोणा, वशीकरणाच्या जाहिरातींचा मारा सुरू असतानाच कल्याण-डोंबिवलीत सर्दी-तापापासून गुप्तरोग-एड््सपर्यंत वेगवेगळ्या रोगांवर हमखास इलाज करणाऱ्या वैदूंचे पेव फुटले आहे.
गल्लोगल्ली अशा वैदूंनी दुकाने थाटली आहेत आणि अवघ्या २० ते २५ रुपयांपासून जडीबुटी, पत्रिका पाहून, मंत्र टाकून त्यांचे उपचार सुरू आहेत. सर्दी-पडशापासून गुप्तरोग ते एड्ससारख्या आजारांवर उपचाराची जाहिरात हे वैदू करीत आहेत. कोणतेही वैद्यकीय ज्ञान नसलेल्या, पण हात लावीन तो उपचार करीन, अशी स्वत:ची ख्याती सांगणाऱ्या या बोगस वैदूंवर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे प्रशासन किंवा पोलीस कारवाई करत नसल्याने आधीच बिघडलेले नागरिकांचे आरोग्य आता सलाइनवर गेल्याचे दिसत आहे.
वातावरणातील सततच्या बदलांमुळे आणि प्रदूषणामुळे कल्याण-डोंबिवलीत ताप, सर्दी, खोकला अशा साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. तापाने फणफणलेले पेशंट दररोज मोठ्या संख्येने दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल होत आहेत. या बेहाल स्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी सध्या परप्रांतांतून आलेल्या बोगस वैदूंनी कल्याण-डोंबिवलीत अनेक ठिकाणी तंबू ठोकून उपचार सुरू केले आहेत. स्वस्तात, जडीबुटीच्या आधारे, भविष्य सांगत ते हमखास उपचाराची गॅरंटी देत असल्याने त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. हे वैदू कोणत्याही रोगावर अवघ्या २० ते ५० रु पयांत जडीबुटीद्वारे उपचार करण्याचे फ्लेक्स लावतात.
दीर्घ आजाराने हैराण असलेले आणि खाजगी डॉक्टरांची फी परवडत नसलेले रुग्ण आशेने त्यांच्याकडे जातात. आजाराचे निदान झाल्यावर मात्र वैदू औषधांसाठी मोठ्या रकमेची मागणी करतात. ग्रामीण भागातील रु ग्णांच्या असहायतेचा, अज्ञानाचा फायदा घेऊन आजारपणाच्या नावाखाली मोठी भीती दाखवून वैदूंनी लुटण्याचा मोठा धंदा सुरू केला आहे. प्रसंगी जीवाची भीती दाखवून उपचाराच्या नावाखाली पैसे उकळले जातात, अशी माहिती ग्रामस्थांनी पुरवली. त्यामुळे ‘रोग परवडला, पण इलाज नको,’ अशी वेळ या रु ग्णांवर ओढवते. या वैदूंवर कारवाई करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. मात्र, या विभागाला अजूनही त्याचे गांभीर्य जाणवलेले नाही. त्यामुळे या वैदूंचे फावले आहे.

Web Title: Kalyan-Dombivali Instant Treatment on Any Disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.