कल्याण-डोंबिवली महापालिकेने कोरोनासाठी वैद्यकीय कर्मचारी भरती केल्याने ताण टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:41 AM2021-04-01T04:41:18+5:302021-04-01T04:41:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण - डोंबिवली महापालिकेची रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर ही दोन बडी रुग्णालये असून, १५ नागरी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण - डोंबिवली महापालिकेची रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर ही दोन बडी रुग्णालये असून, १५ नागरी आरोग्य केंद्रे आहेत. या ठिकाणी अत्यावश्यक वैद्यकीय कर्मचारी भरण्याची प्रक्रिया २०१४ सालापासून सुरू आहे. मात्र त्याला योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर राज्याच्या परीक्षा महापोर्टलद्वारेच ही पदे भरण्याची प्रक्रिया पार पाडली जावी, अशी अट असल्याने भरतीप्रक्रिया मागे पडत राहिली. त्यानंतर मार्च २०२०मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. आरोग्य यंत्रणा तुटपुंजी असल्याने महापालिकेने कोरोनाकाळापुरते कर्मचारी भरण्याची प्रक्रिया सुरू केली. पहिल्या प्रयत्नात अल्पप्रतिसाद आला. मात्र त्यानंतर वाॅर्डबॉय आणि नर्स भरतीस चांगला प्रतिसाद मिळाल्याने कोरोना काळापुरती ही पदे भरलेली आहेत. आता पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना या पदांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे प्रयत्नही महापालिकेने सुरू केले आहेत. त्यामुळे आणखी पदे कायमस्वरूपी भरण्याची गरज भासणार आहे.
--------------
कल्याण डोंबिवली महापालिकेची दोन बडी रुग्णालये आणि १५ नागरी आरोग्य सुविधा केंद्रे आहेत. त्यासाठी ११५ वैद्यकीय पदे मंजूर आहेत. वारंवार जाहिराती देऊनही त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यापैकी केवळ ४५ पदे भरलेली आहेत. कोरोनाकाळात आपत्कालीन साथरोग नियंत्रणासाठी विविध पदांकरिता चारशे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ३९१ पदे भरली गेली आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ही पदे पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहेत.
डॉ. अश्विनी पाटील,
मुख्य वैद्यकीय अधिकारी,
कल्याण-डोंबिवली महापालिका
--------------
आवश्यक कर्मचारी
आरोग्याशी संबंधित महापालिकेत ३०० कर्मचारी आहेत. महापालिकेची दोन रुग्णालये आहेत. त्यात ११५ वैद्यकीय पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४५ पदे भरलेली आहेत. उर्वरित ७० पदे रिक्त आहेत.
--------------
कोरोनाकाळात भरलेली पदे
वैद्यकीय अधिकारी एमडी-१
वैद्यकीय अधिकारी पीजी-१
वैद्यकीय अधिकारी जनरल-१
वैद्यकीय अधिकारी आयुष-२५
स्टाफ नर्स-३६
सहाय्यक नर्स-४८
नर्सिग असिस्टन्स-३९
ईसीजी तंत्रज्ञ-४
लॅब तंत्रज्ञ-१७
एक्सरे तंत्रज्ञ-१२
फार्मासिस्ट-१६
वार्डबॉय-१८७
समुपदेशक-२
हॉस्पिटल मॅनेजर-२
एकूण-३९१
---------------
एकूण कोरोना रुग्ण-७८ हजार २८७
बरे झालेले रुग्ण-६८ हजार ६३८
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण- ८ हजार ४२७
होम क्वाॅरण्टाइन झालेले एकूण रुग्ण- ४६ हजार ५९७
एकूण बळी- एक हजार २२२
------------------