कल्याण डोंबिवली : पाणी दरवाढीच्या कचाट्यातून निवासी नागरिकांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 09:29 PM2018-01-24T21:29:37+5:302018-01-24T21:29:50+5:30

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवासी पाणी दरात तीन रुपये वाढ प्रस्तावित करण्यात आली होती. ही दरवाढ स्थायी समितीच्या बुधवारी पार पडलेल्या सभेत फेटाळून लावण्यात आली आहे.

Kalyan Dombivali: Rescue residents rescued from the water scarcity crisis | कल्याण डोंबिवली : पाणी दरवाढीच्या कचाट्यातून निवासी नागरिकांची सुटका

कल्याण डोंबिवली : पाणी दरवाढीच्या कचाट्यातून निवासी नागरिकांची सुटका

Next

कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवासी पाणी दरात तीन रुपये वाढ प्रस्तावित करण्यात आली होती. ही दरवाढ स्थायी समितीच्या बुधवारी पार पडलेल्या सभेत फेटाळून लावण्यात आली आहे. मात्र हॉटेल्स, परमीटरुम, लॉजिंग बोर्डिंग, मंगल कार्यालये यांच्या पाणी दरात ९ रुपयांनी वाढ करण्यास समितीने मंजूरी दिली आहे.
निवासी आणि वाणिज्य वापराच्या पाणी दरात वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर मंजूरीसाठी मांडण्यात आला होता. या विषयाचे विवेचन करताना पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी सांगितले की, महापालिकेच्या मोहिली, नेतीवली जलशुद्धीकरण केंद्रातून ४०० दश लक्ष लिटर पाण्यावर शुद्धतेची प्रक्रिया करुन ते पुरविण्याची क्षमताा महापालिकेकडे आहे. कच्चे पाणी, त्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करणे, त्यासाठी लागणारी वीज, रसायने, आस्थापना खर्च, देखभाल दुरुस्तीचा खर्च, योजनेसाठी घेतलेले कर्जाची परतफेड पाहता पाणी दरात वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. तीन हजार लिटर पाण्यासाठी महापालिका सध्या सात रुपये दर आकारते. त्यात तीन रुपये दरवाढ सुचविण्यात आली. तीन हजारापेक्षा जास्त पाण्याचा वापर करणाºयांना सात रुपये ऐवजी २० रुपये दर आकारण्याचे प्रस्तावित होते. तसेच वाणिज्य वापरासाठी विविध स्वरुपात पाणी दरवाढ प्रस्तावित केली होती. नागरीक किती पाणी वापरात. शहरातील प्रत्येक घराला मीटरींग झाले आहे. मोजन मापून पाणी देतो का हे प्रश्न सदस्य निलेश शिंदे, माधुरी काळे, दीपेश म्हात्रे यांनी उपस्थित केला. तसेच सदस्या छाया वाघमारे यांनी नागरीकांना पाणी न देता त्यांच्या पाण्याच्या दरात वाढ करणे कितपत योग्य आहे. त्यामुळे नागरीकांचा महापालिकेच्या विरोधात वाढणार आहे. याचा सारासार विचार झाला पाहिजे या मुद्याकडे सदस्यांनी लक्ष वेधल्याने सभापती राहूल दामले यांनी निवासी पाणी दरात सुचविलेली तीन रुपायंची दरवाढ फेटाळून लावली आहे. मात्र हॉटेल्स, परमीट रुम, लॉजिंग बोर्डिंग, मंगल कार्यालयाना तीन हजार लिटर पाणी ३६ रुपये दराने दिले जाते. त्यात ९ रुपये वाढ करण्याचे सदस्यांनी सूचित केले. त्यानुसार सभापतीने ९ रुपये दरवाढीस मान्यता दिली. त्यामुळे या मंडळीना आत्ता तीन हजार लिटर पाण्यासाठी ४५ रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ १ एप्रील २०१८ पासून लागू होणार आहे.
चौकट-बेकायदा नळ जोडण्या केवळ ४५० ?
मालमत्ता सर्वेक्षणाचे काम कोलब्रो कंपनीला दिले होते. या कंपनीने ८० टक्के काम पूर्ण करुन केवळ मालमत्ताचा शोध घ्यायचा नव्हता तर बेकायदा नळ जोडण्याही शोधायच्या होत्या. त्या कंपनीने केवळ ४५० बेकायदा नळ जोडण्या शोधल्याची माहिती कार्यकारी अभियंता पाठक यांनी यावेळी दिली. मग या कंपनीला आठ कोटीचे बिल कशाच्या आधारे दिले असा सवाल सदस्यांनी उपस्थीत केला. कंपनीने आठ कोटी लागून केवळ ४५० बेकायदा नळ जोडण्या शोधल्याने हा शोध हास्यास्पद असून महापालिकेची दिशाभूल करणारा आहे.
चौकट-मीटर किती लावले ?
ज्या सोसायट्यांच्या तळ आणि गच्चीवर पाण्याच्या टाक्या आहेत. अशा २१ हजार ८०० सोसायट्यांना मिटर लावले आहेत. हे काम २००१ ते २००३ या कालावधीत झाले आहे. पुन्हा २००९ ते २०१४ या कालावधीत केंद्र्र सरकारच्या योजने अंतर्गत मीटरींग करण्यासाठी काम हाती घेतले. त्यापैकी ७० हजार ९२२ नळ जोडण्यांना मीटर लावले आहे. पाच हजार मीटर जोडण्याना मीटर लावणे बाकी आहे. हे शिल्लक राहिलेले काम महापालिकेच्या माध्यमातून केले जाणार आहे. महापालिकेने २०१४ साली बेकायदा नळ जोडण्या नियमीत करण्याचा ठराव मंजूर केला होता. या ठरावानुसार ६ हजार ८०० बेकायदा नळ जोडण्याना २.५ पट्टीने दंड आकारुन नियमीत करण्यात आले आहे. त्यातून महापालिकेच्या तिजोरीत एक कोटी २२ लाख रुपये जमा झालेले आहेत.

Web Title: Kalyan Dombivali: Rescue residents rescued from the water scarcity crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी