कल्याण डोंबिवली सारांश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:40 AM2021-03-05T04:40:51+5:302021-03-05T04:40:51+5:30

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात गुरुवारी नव्या २४४ रुग्णांची भर पडली तर १३६ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. गुरुवारी आढळून ...

Kalyan Dombivali Summary | कल्याण डोंबिवली सारांश

कल्याण डोंबिवली सारांश

Next

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात गुरुवारी नव्या २४४ रुग्णांची भर पडली तर १३६ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. गुरुवारी आढळून आलेल्या नव्या रुग्णांमुळे महापालिका क्षेत्रात आतापर्यंतची एकूण रुग्ण संख्या ६२ हजार ९३४ झाली असून, यातील ६० हजार ८७२ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर गेल्या २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. सद्य:स्थितीत १,८८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

------------------------------------------------

बंद पथदिवे चालू करा

कल्याण : पश्चिमेकडील ‘ब’ प्रभागातील प्रभाग १ सापार्डे परिसरातील मुख्य रस्त्यावरील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. नागरिकांची रस्त्यावरून येता-जाताना फार मोठी गैरसोय होत आहे. येथील मनसे वॉर्ड अध्यक्ष महेश पाटील यांनी या प्रकरणी केडीएमसीच्या विद्युत विभागाला पत्र देऊन बंद पथदिवे चालू करण्याची मागणी केली आहे.

---------------------------------------------------

भांडणाच्या रागातून मारहाण

कल्याण : इरफान खान याला मागील भांडणाच्या रागातून काका शहावली खान आणि चुलत भाऊ नूर मोहम्मद यांनी लाकडी दांडक्यांनी मारहाण केल्याची घटना पश्चिमेकडील बैलबाजार परिसरात सोमवारी दुपारी दीड वाजता घडली. या प्रकरणी शहावली आणि नूर मोहम्मद या दोघांविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

------------------------------------------------------

वाचली.

Web Title: Kalyan Dombivali Summary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.