कल्याण डोंबिवली सारांश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:39 AM2021-04-13T04:39:07+5:302021-04-13T04:39:07+5:30

डोंबिवली : पिसवली गावात राहणाऱ्या साहील भोईर या १८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी ...

Kalyan Dombivali Summary | कल्याण डोंबिवली सारांश

कल्याण डोंबिवली सारांश

Next

डोंबिवली : पिसवली गावात राहणाऱ्या साहील भोईर या १८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. साहीलने घराच्या जवळच असलेल्या मंडपाचे डेकोरेशनचे सामान ठेवलेल्या मंडपाचे शेडच्या छताचे बांबूला बांधलेल्या पडद्याच्या सहाय्याने गळफास घेतला. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. या घटनेची नोंद मानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

------------------------------------

कोरोनाचे १,४१४ नवे रुग्ण

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. सोमवारी कोरोनाचे एक हजार ४१४ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. २४ तासात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजार १०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर भर पडल्याने सध्या १६ हजार ४५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजमितीला कोरोना बाधितांचा आकडा ९७ हजार ५९२ पर्यंत पोहोचला आहे. यातील ७९ हजार ८४३ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत. तर १ हजार २९६ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कल्याण पूर्वेत २०९, डोंबिवली पूर्वेत ४४४, कल्याण पश्चिमेत ४४३, डोंबिवली पश्चिमेला १९३, मांडा टिटवाळा ९६, तर मोहना २६, तर पिसवलीत तीन नवीन रुग्ण आढळले आहेत.

------------------------------------------------------

Web Title: Kalyan Dombivali Summary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.