कल्याण-डोंबिवली महापौर निवड होणार बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 06:55 AM2018-05-07T06:55:53+5:302018-05-07T06:55:53+5:30

  कल्याण-डोंबिवलीच्या महापौर-उपमहापौरपदाची बुधवारी पार पडणारी निवडणूक बिनविरोध होईल, असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. भाजपाने मात्र कोणतीही भूमिका जाहीर न करता ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’चा पवित्रा घेतला आहे. त्यातच महापौर आणि उपमहापौरपदासाठी प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणाऱ्या भाजपाच्या नगरसेविका उपेक्षा भोईर आणि शिवसेनेचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कासिफ तानकी हेही त्याच दिवशी माघार घेण्याची चिन्हे असल्याने त्या दिवशी नेमक्या कोणकोणत्या घडामोडी घडतात, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 Kalyan-Dombivli mayor elected will be elected unopposed | कल्याण-डोंबिवली महापौर निवड होणार बिनविरोध

कल्याण-डोंबिवली महापौर निवड होणार बिनविरोध

Next

- प्रशांत माने
कल्याण -  कल्याण-डोंबिवलीच्या महापौर-उपमहापौरपदाची बुधवारी पार पडणारी निवडणूक बिनविरोध होईल, असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. भाजपाने मात्र कोणतीही भूमिका जाहीर न करता ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’चा पवित्रा घेतला आहे. त्यातच महापौर आणि उपमहापौरपदासाठी प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणाऱ्या भाजपाच्या नगरसेविका उपेक्षा भोईर आणि शिवसेनेचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कासिफ तानकी हेही त्याच दिवशी माघार घेण्याची चिन्हे असल्याने त्या दिवशी नेमक्या कोणकोणत्या घडामोडी घडतात, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
उल्हासनगरच्या सत्तांतराच्या राजकारणात भाजपा कल्याणमधील महापौरपदाचा दावा सोडेल, असे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. त्याप्रमाणे महापौरपदासाठी शिवसेनेकडून विनीता राणे आणि उपमहापौरपदासाठी भाजपाच्या उपेक्षा भोईर यांनी एकत्रित आपापले उमेदवारी अर्ज महापालिका सचिव संजय जाधव यांना सादर केले होते. परंतु शिवसेनेचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कासिफ तानकी यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्याने उपमहापौरपदासाठी भाजपाकडून अर्ज भरणाºया भोईर यांनी महापौरपदासाठीही अर्ज भरला. प्रारंभी उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना-भाजपामध्ये युतीचे चित्र दिसून आले. पण तानकी यांच्या अर्जामुळे ही शिवसेनेचीच नवी खेळी असल्याचा भाजपा नेत्यांचा समज झाला. त्यामुळेच महापौरपदासाठी अर्ज दाखल करणाºया उपेक्षा भोईर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करणारे कासिफ तानकी हे दोघेही आपला अर्ज मागे घेतील आणि निवडणूक बिनविरोध होईल, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे गटनेते रमेश जाधव दिले. उमेदवारी मागे घेण्याच्या अर्जावर भोईर आणि तानकी यांच्या स्वाक्षºया घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपाचे गटनेते वरूण पाटील यांनी शिवसेनेच्या दोन्ही अर्जांवर सावध पवित्रा घेत बुधवारी निवडणुकीच्या वेळीच काय तो निर्णय होईल, असे मोघम सांगत पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली नाही.

‘आमदारकीसाठी
विचार करा’

महापौरपदासाठी शिवसेनेच्या इच्छुक नगरसेविकात वैशाली भोईर यांचाही समावेश होता. परंतु त्यांचा विचार न झाल्यामुळे नगरसेवक असलेले त्यांचे दीर जयवंत भोईर नाराज आहेत. पक्षाच्या आदेशापुढे आम्ही काहीही बोलू शकत नाही. परंतु आगामी स्थायी समिती सभापती आणि आमदारकीच्या निवडणुकीसाठी आमचा विचार होणे आवश्यक आहे. अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा भोईर यांनी दिला.

कोण आहेत राणे, भोईर आणि तानकी?

महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शिवसेना नगरसेविका विनीता राणे यांची नगरसेवकपदाची ही पहिलीच टर्म आहे. राणे यांचे शिक्षण डिप्लोमा इन जनरल नर्सिंग असे आहे. मुंबई महापालिकेच्या नायर रूग्णालयात सिस्टर इन्चार्ज म्हणून त्यांनी ३२ वर्षे सेवा बजावली आहे. स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या राणे यांनी २०१५ ला पहिल्यांदा महापालिकेची निवडणूक लढविली आणि त्या डोंबिवली पश्चिमेकडील जुनी डोंबिवली प्रभागातून शिवसेनेच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या. त्यांचे पती विश्वनाथ राणे हे २००० पासून नगरसेवक म्हणून महापालिकेत आहेत. त्यांनी गटनेता, विरोधी पक्षनेता ही पदेही भूषविली आहेत.

उपमहापौरसह महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाºया भाजपाच्या उपेक्षा भोईर यांची केडीएमसीतील नगरसेवकपदाची दुसरी टर्म आहे. २०१५ ला त्या मांडा पूर्व या प्रभागातून निवडून आल्या आहेत. सभागृहातील अभ्यासू आणि सडेतोड व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे शिवसेनेचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कासिफ तानकी यांचीही ही नगरसेवकपदाची पहिलीच टर्म आहे. सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख असलेले तानकी हे कल्याण पश्चिमेतील सिध्देश्वर आळी या प्रभागातून अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. निवडून आल्यावर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

‘बुधवारीच चित्र
स्पष्ट होईल’
महापौरपदासाठी उमेदवारी दाखल करणाºया भाजपाच्या नगरसेविका उपेक्षा भोईर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही बुधवारीच महापौरपदासाठी दाखल केलेला अर्ज मागे घ्यायचा की जैसे थे ठेवून निवडणूक लढवायची याचा निर्णय होईल, असे सांगितले. पक्षाचे वरिष्ठ जो आदेश देतील, त्याप्रमाणे कृती होईल असे भोईर म्हणाल्या. तर उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे कासिफ तानकी यांनीही माघारीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही आणि मी उमेदवारी मागे घेण्याच्या कोणत्याही अर्जावर स्वाक्षरी केलेली नाही. बुधवारीच काय ते समोर येईल, असे ते म्हणाले.

कोअर कमिटीचा दावा फोल : कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आगामी महापौर भाजपाचाच असेल, असे परिपत्रक त्या पक्षाने जारी केले होते . पण हा दावा फोल ठरला आहे. उल्हासनगरच्या राजकारणातून भाजपाने ऐनवेळी शिवसेनेपुढे नमते घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. राजकीय स्वार्थापोटी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेपुढे नांगी टाकल्याचा आरोप त्यांच्याकडून होत आहे.

Web Title:  Kalyan-Dombivli mayor elected will be elected unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.