Kalyan: कसारा मार्गावर उंबरमाळी मध्ये मालगाडीच्या इंजिनात बिघाड, लांबपल्याच्या गाड्या रखडल्या
By अनिकेत घमंडी | Published: September 26, 2023 12:34 PM2023-09-26T12:34:22+5:302023-09-26T13:56:57+5:30
Central Railway: मध्य रेल्वेच्या कल्याण कसारा मार्गावरील उंबरमाळी थांब्यादरम्यान मालगाडीचे इंजिन फेल झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.२० वाजता घडली.त्यामुळे आसनगाव कसारा खर्डी मार्गावरील अप दिशेकडील रेल्वे वाहतूक खोळंबली.
- अनिकेत घमंडी
डोंबिवली - मध्य रेल्वेच्या कल्याण कसारा मार्गावरील उंबरमाळी थांब्यादरम्यान मालगाडीचे इंजिन फेल झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.२० वाजता घडली.त्यामुळे आसनगाव कसारा खर्डी मार्गावरील अप दिशेकडील रेल्वे वाहतूक खोळंबली. दरम्यान, दुपारी १२.५५ दरम्यान ती समस्या सोडवण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले, मात्र त्या घटनेमुळे दोन तास कसारा आसनगाव मार्ग बंद होता. दुपारी १.१० नंतर हळुहळु वाहतूक पूर्वपदावर आली.
त्याचा फटका एक कसारा सीएसटी, भुवनेश्वर एक्स्प्रेस, धुळे दादर या तीन गाड्यांना बसला. त्यामध्ये हजारो प्रवासी गाडीत ताटकळले. पाऊस नाही पण आभाळ असल्याने वातावरणात उकाडा असल्याने गाडीत स्लीपर क्लास, सेकंड क्लासमध्ये बसलेल्या प्रवाशांना गर्मी,उकड्यल्याने अधिक त्रास झाला.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार डाऊन मार्गवरून एक इंजिन आल्यानंतर मालगाडीला ते।जोडले जाईल आणि त्यानंतर तो मार्ग सुरळीत।होईल, तोपर्यंत मात्र वाट बघण्याशिवाय पर्याय नसल्याने प्रवासी हैराण झाले होते.
गणेशोत्सव दरम्यान राज्यात, देशात इतरत्र गेलेले प्रवासी पुन्हा मुंबईकडे परतत असून अपच्या गाड्या फुल्ल असून त्यामध्ये असे तांत्रिक अडथळे आल्याने प्रवाशांचे अधिक हाल होत असल्याने पर्यायी व्यवस्थेची अधिक आवश्यकता असल्याचे प्रवाशांनी सांगितले. वर्षानुवर्षे ही समस्या ठिकठिकाणी कमी अधिक।प्रमाणात होते, तरीही रेल्वे प्रशासन सतर्क का होत नाही, प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची ते दखल का घेत नाहीत असा नाराजीचा पण संतप्त सवाल प्रवाशांनी व्यक्त केला.