कल्याण-कर्जत-कसारा थेट नवी मुंबईला जोडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 01:35 AM2018-12-30T01:35:50+5:302018-12-30T01:36:03+5:30

हार्बर आणि मध्य रेल्वेला जोडणाऱ्या सॅण्डहर्स्ट रेल्वेस्टेशनच्या धर्तीवर कळवा येथे लवकरच उन्नत रेल्वेस्थानक आकार घेणार आहे.

Kalyan-Karjat-Kasara will connect directly to Navi Mumbai | कल्याण-कर्जत-कसारा थेट नवी मुंबईला जोडणार

कल्याण-कर्जत-कसारा थेट नवी मुंबईला जोडणार

Next

- नारायण जाधव

ठाणे : हार्बर आणि मध्य रेल्वेला जोडणाऱ्या सॅण्डहर्स्ट रेल्वेस्टेशनच्या धर्तीवर कळवा येथे लवकरच उन्नत रेल्वेस्थानक आकार घेणार आहे. हे दुमजली स्थानक बांधण्यासाठी एमआरव्हीसी अर्थात मुंबई रेल्वे विकास महामंडळाने निविदा प्रक्रिया सुरू केली असून, ते पूर्ण झाल्यावर कल्याण-कर्जत-कसा-याचे प्रवासी थेट नवी मुंबईला जाऊ शकणार आहेत. या मार्गावरील कळव्यानंतर नवी मुंबईला जोडणा-या दिघा रेल्वेस्थानकाचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे. कळवा आणि दिघ्याला जोडणा-या या उन्नतमार्गाच्या संपूर्ण प्रकल्पावर ४७६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
यातील पहिला टप्पा १२८ कोटींचा असून त्यात कळवा-दिघादरम्यानच्या पारसिक डोंगराजवळून जाणा-या पुलासह दिघास्थानकाचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी एमयूटीपी-३ अंतर्गत रेल्वे जागतिक बँकेकडून कर्ज घेणार आहे.
फलाटांत होणार बदल :
कळवा-मुंब्रादरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वेलाइनचे काम सुरू असून हे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा रेल्वेचा मानस आहे. यात मुंब्रा स्थानकात होणाºया दोन नव्या प्लॅटफॉर्मवर धीम्या गतीची लोकल थांबवण्यात येणार असून विद्यमान प्लॅटफॉर्मवरून जलद लोकल धावणार आहेत.
तर, कळवा स्थानकातील नव्या प्लॅटफॉर्मवरून जलद लोकल धावणार असून सध्याच्या प्लॅटफॉर्मवरून धीम्या गतीच्याच लोकल धावतील, असे सांगण्यात आले.

ठाणे रेल्वे स्थानकाचा भार कमी होणार
- कळवा आणि दिघा स्थानकांस जोडणाºया उन्नतमार्गाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ही लाइन दिघा स्टेशननंतर एलिव्हेटेड सेक्शनवर चालवली जाईल. ती कळव्यातून पुढे जाईल.
- हे काम पूर्ण झाल्यावर नवी मुंबईला येजा करणाºया कल्याण-कर्जत कसाºयाच्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. कारण, एकदा ती सुरू झाली की, या प्रवाशांना नवी मुंबईकडे जाण्यासाठी ठाणे स्थानकात उतरून पुन्हा ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल पकडावी लागणार नाही.
- या नव्या मार्गाने ते थेट कळव्याहून दिघामार्गे नवी मुंबईला जाऊ शकणार आहेत. यामुळे ठाणे स्थानकावरील मोठा ताणही कमी होणार आहे.

नव्या स्थानकांत या सुविधा...
नव्या उन्नत कळवा स्थानकात बेस्टलेस ट्रॅकसह रेल्वे फ्लायओव्हरची योजना आखली आहे. शिवाय प्लॅटफॉर्म, बुकिंग आॅफिस, कनेक्टेड भुयारी पादचारी मार्ग, जिना, कॅफेटरिया, प्रसाधनगृह आणि तत्सम कामांचा समावेश आहे.

Web Title: Kalyan-Karjat-Kasara will connect directly to Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :localलोकल