कल्याण लोकसभा निवडणूक निकाल 2019: शिवसेनेची 'शिंदे'शाही जोमात, विरोधक कोमात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 11:54 AM2019-05-23T11:54:29+5:302019-05-23T12:04:03+5:30
Kalyan Lok Sabha Election Results 2019 सध्या हाती येत असलेले कल पाहता शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी 60 हजार मतांची आघाडी घेतली आहे.
कल्याण - कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व आहे. गेल्या दोन निवडणुकीत याठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेत. 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते. कल्याण हा शिवसेनेचा गड मानला जातो. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीकडून पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून बाबाजी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. बहुजन समाज पक्ष आणि वंचित आघाडीनेही आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पण, सध्या हाती येत असलेले कल पाहता शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी 60 हजार मतांची आघाडी घेतली आहे.
आत्तापर्यंतच्या फेरीत श्रीकांत शिंदे यांना 97 हजार 627 मते मिळाली असून बाबाजी पाटील यांना 30 हजार 249 मते मिळाली आहेत.
मागच्या निवडणुकीत श्रीकांत शिंदेंचा विजय मिळविला होता.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतर्फे श्रीकांत शिंदे यांनीच निवडणूक लढवली होती. त्यांना यावेळी 4 लाख 40 हजार 892 मतं मिळाली. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आनंद परांजपेंना 1 लाख 90 हजार 143 मतं मिळाली. तर तिसऱ्या स्थानावर मनसेचे प्रमोद पाटील होते. त्यांना 1 लाख 22 हजार 349 मतं मिळाली.
कल्याण लोकसभा मतदारसंघ : 18 लाख 61 हजार 577 मतदार असून त्यात 10 लाख 06 हजार 932 पुरुष, तर 8 लाख 54 हजार 464 महिला आहेत तर मतदानाचा टक्का - 45.28 टक्के होता.