कल्याणमध्ये माघी गणपती बाप्पांनी केली वाहतुकीची जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:47 AM2021-02-17T04:47:27+5:302021-02-17T04:47:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : ३२व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाअंतर्गत माघी गणेशोत्सवानिमित्त समाजामध्ये जनजागृती व्हावी, वाहतुकीचे नियम सामान्य ...

In Kalyan, Maghi Ganpati Bappa created traffic awareness | कल्याणमध्ये माघी गणपती बाप्पांनी केली वाहतुकीची जनजागृती

कल्याणमध्ये माघी गणपती बाप्पांनी केली वाहतुकीची जनजागृती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : ३२व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाअंतर्गत माघी गणेशोत्सवानिमित्त समाजामध्ये जनजागृती व्हावी, वाहतुकीचे नियम सामान्य जनतेने पाळावेत, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी मंगळवारी कल्याण रेल्वेस्टेशन परिसर, शिवाजी चौक, सहजानंद चौक, या ठिकाणी गणपती बाप्पाच्या प्रतीकात्मक भूमिकेत जय गजानन पाटील व आदित्य केशव मालुंजकर यांनी रिक्षा, कार व दुचाकीचालकांना वाहतुकीचे नियम पाळून आपले व आपल्या परिवाराचे संरक्षण करणे गरजेचे आहे, असा संदेश दिला.

पोलीस आयुक्तालय वाहतूक उपशाखा कल्याण वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य आरएसपीचे महासमादेशक अरविंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण येथे हा उपक्रम घेण्यात आला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत आरएसपी कमांडर मणिलाल शिंपी व सहायक पोलीस निरीक्षक राजपूत यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता रस्ता सुरक्षा जनजागृतीस सुरुवात झाली. याप्रसंगी एसएसटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यद्वारे वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळणे किती गरजेचे आहे, याची जाणीव करून दिली.

यावेळी यावेळी अधिकारी बन्सीलाल महाजन, गजानन पाटील, विजय भामरे आनंत जगे, पोलीस हवालदार श्याम जगताप पाटील यांच्यासह सर्व कर्मचारी आदींनी सहकार्य केल्याचे शिंपी म्हणाले. या उपक्रमाबद्दल माजी नगरसेवक सुनील वायले यांनी कौतुक केले. रोटी डे ग्रुप व स्वामीनारायण हॉलचे संचालक दिनेश ठक्कर, तरुण नागडा केतन शहा यांनी महाविद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना १५ किलो अन्नधान्य किट दिले.

गांधीगिरी करून गुलाबपुष्प दिले भेट

कार्यक्रमाच्या अखेरीस गजानन चौकात सीटबेल्ट न लावणाऱ्या कारचालक, हेल्मेट न घालणारे दुचाकीचालक यांना गांधीगिरीच्या मार्गाने गुलाबपुष्प देऊन वाहतुकीचे नियम पाळा, परिवाराची काळजी घ्या व पोलीस विभागाला आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

-//-------

फोटो आहे

Web Title: In Kalyan, Maghi Ganpati Bappa created traffic awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.