Kalyan: राज्यस्तरीय संस्कृत परीक्षेत ओक हायस्कूलचे यश

By सचिन सागरे | Published: March 4, 2023 02:31 PM2023-03-04T14:31:41+5:302023-03-04T14:32:14+5:30

Kalyan: राज्यस्तरीय संस्कृत परीक्षेत येथील बालक मंदिर संस्थेच्या कॅप्टन रवींद्र माधव ओक हायस्कूलमधील चार विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय पारितोषिक जाहीर झाले आहे.

Kalyan: Oak High School Success in State Level Sanskrit Examination | Kalyan: राज्यस्तरीय संस्कृत परीक्षेत ओक हायस्कूलचे यश

Kalyan: राज्यस्तरीय संस्कृत परीक्षेत ओक हायस्कूलचे यश

googlenewsNext

- सचिन सागरे

कल्याण : कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक (नागपूर) द्वारा रवी कीर्ती संस्कृत अध्ययन केंद्र, सांगली यांच्यामार्फत फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय संस्कृत परीक्षेत येथील बालक मंदिर संस्थेच्या कॅप्टन रवींद्र माधव ओक हायस्कूलमधील चार विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय पारितोषिक जाहीर झाले आहे.

संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून दीक्षा प्रसाद मराठे (राज्यात चौथा), पद्मेश जोगळेकर (राज्यात चौथा), सौम्या खाडिलकर (राज्यात चौथा) व कस्तुरी निगडे (राज्यात पाचवा) या राज्यस्तरीय परीक्षेत उतीर्ण झाले आहेत. या यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक धिरसिंग पवार, उपमुख्याध्यापक उत्तम गायकवाड, पर्यवेक्षक दिलीप तडवी,  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या द्वारे या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. या विद्यार्थ्यांना शाळेतील संस्कृत शिक्षक मिलिंद खळदकर तसेच वैशाली भोईर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

Web Title: Kalyan: Oak High School Success in State Level Sanskrit Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.