भाडयाच्या बचतीसाठी कल्याण पंचायत समितीचे अखेर गोवेलीला होईल स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 04:25 PM2018-09-16T16:25:57+5:302018-09-16T16:44:04+5:30
कल्याण शहरापासून गोवेली लांब आहे. याशिवाय तेथे पोहोचण्यासाठी वाहनांचा देखील अभाव आहे. कल्याण - अहमदनगर महामार्गावर असलेल्या या गोवेली आहे. या गावाला जाण्यासाठी वाहतूक कोंडी जीव घेणी आहे. यामुळे पंचायत समितीत येणाऱ्या ग्रामस्थाला या कालार्यालयात जाणे जीकरीचे होईल. यातून मार्ग काढण्यासाठी कल्याणला भा्याची इमारत घेण्याचा आग्रह कल्याण पंचायत समितीच्या सभापती दर्शना जाधव, यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत लावून धरला
ठाणे : कल्याण पंचायत समितीची इमारत धोकादायक स्थितीत असून तिचे त्वरीत स्थलांतर होणे गरजेचे आहे . त्वरीत आहे. या इमारतीची पुर्बांधणी करणे अपेक्षित आहे. तत्पुर्वी या कार्यालयासाठी भाड्याची इमारत घेण्याचा आग्रह आहे. पण भाडे जास्त असल्यामुळे ते भरणे शक्य नाही. ते वाचवण्यासाठी पंचायत समिती तात्पुर्ती गोवेली येथील आरोग्य केंद्रात हलवण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषदेने घेतला.
कल्याण शहरापासून गोवेली लांब आहे. याशिवाय तेथे पोहोचण्यासाठी वाहनांचा देखील अभाव आहे. कल्याण - अहमदनगर महामार्गावर असलेल्या या गोवेली आहे. या गावाला जाण्यासाठी वाहतूक कोंडी जीव घेणी आहे. यामुळे पंचायत समितीत येणाऱ्या ग्रामस्थाला या कालार्यालयात जाणे जीकरीचे होईल. यातून मार्ग काढण्यासाठी कल्याणला भाड्याची इमारत घेण्याचा आग्रह कल्याण पंचायत समितीच्या सभापती दर्शना जाधव, यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत लावून धरला. पण त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंजुषा जाधव, मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी समज दिली. गोवेली येथे जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्राची वास्तू आहे. ती रिकामाची धूळखात पडून असल्यामुळे पंचायत समिती त्यात तात्पुरते हलवण्याचे सुचित केले. यामुळे भाड्याची मोठी रक्कमही बचत होणार असल्याची चर्चा झाली.
या पंचायत समितीची पाहाणी ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी देखील काही महिन्यांपूर्वी करून इमारत धोकादायक असल्याचे अहवाल जिल्हा परिषदेला दिला. या कार्यालयाचे पुनर्वसन वेळीच होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केलेली आहे. पण कल्याण शहरात भाडेही जास्त आहे. या तुलनेत राज्य शासनाकडून भरीव रक्कम भाडे भरण्यासाठी मिळत नाही. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी व संभाव्य धोका वेळीच टाळण्यासाठी कल्याण पंचायत समितीला गोवेली येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. या इमारतीचे बांधकाम १९६५ मध्ये झाले. सध्या या इमारतीची स्थिती दयनीय झाली आहे. या इमारतीचा काही दिवसांपूर्वी स्लॅब निखळला होता. त्यानंतर या पंचायत समितीतील कर्मचाºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. धोकादायक व जीर्ण झालेली ही इमारत वेळीच पाडणे गरजेचे आहे. पंचायत समितीच्या या जागेवर पुन्हा नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ९९२ चौरस मीटरच्या भूखंडावर या पंचायत समितीची इमारत उभी करण्यात येणार आहे. यासाठी या पंचायत समितीचे कार्यालय लवकरच गोवेली येथे लवण्याचे जिल्हा परिषदेचे प्रयत्न सुरू आहे.