आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत कल्याणकरांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 10:45 AM2018-08-02T10:45:03+5:302018-08-02T10:57:40+5:30

आंतरराष्ट्रीय स्टुडंटस ऑलिम्पिक संघटनेच्यावतीने थायलंड येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत कल्याणच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली.

kalyan players win international skating competition | आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत कल्याणकरांची बाजी

आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत कल्याणकरांची बाजी

Next

कल्याण : आंतरराष्ट्रीय स्टुडंटस ऑलिम्पिक संघटनेच्यावतीने थायलंड येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत कल्याणच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. आपल्या खेळाचे चमकदार प्रदर्शन करत भारताचा झेंडा थायलंडमध्ये फडकवला. विशेष म्हणजे या स्पर्धेत पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंचा धुव्वा उडवत भारतीय संघ आघाडीवर होता.  

कल्याणचे आमदार गणपतशेठ गायकवाड, आमदार नरेंद्र पवार यांनी दमदार कामगिरी करणाऱ्या सर्व खेळाडूंचा गौरव व कौतुक केले. तर समाजसेवक राजा सावंत यांनी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे जेष्ठ नगरसेवक प्रकाश पेणकर, सभागृह नेते श्रेयस समेळ, नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, त्याचबरोबर विजय कडव, अजय पवार, प्रविण खाडे हे मान्यवर उपस्थित होते. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून सागर  कुलदीप, व गणेश बागूल याचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकी साळवी, कल्पेश दवे आतिष साळवी निरंजन सावंत विजय भालेराव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

स्पर्धकांची नावे - 

1) अथर्व खैरनार - 2 सुवर्णपदक                  
2) श्लोक देशपांडे - 2 सुवर्णपदक
3) यश जशवारा - 2 सुवर्णपदक.                     
4) सानिया श्री सुवर्णा - 2 सुवर्णपदक.               
5) प्रणय साळवे - 2 सुवर्णपदक.                       
6) वायू जैन - 1 सुवर्णपदक.                                  
7) विनंती फोंडेकर - 2 सुवर्णपदक           
8) निर्मिती म्हात्रे - 2 सुवर्णपदक.                    
9) हरी हरण बुरगण - 1 सुवर्णपदक. 
 

Web Title: kalyan players win international skating competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण