कल्याण: राजकीय वादातून राडा, तलवारीने वार; 25 जणांची रात्रीच्या अंधारात दहशत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 03:23 PM2017-09-18T15:23:41+5:302017-09-18T15:24:01+5:30
राजकीय वादात न पडण्याच्या कारणावरून जिवाभावाच्या मित्रावर व त्याच्या कुटुंबियांवर 25 ते 30 जणांच्या सहाय्याने खुनी हल्ला करण्यात आल्याचा प्रकार खडकपाडा परिसरात घडला.
कल्याण, दि. 18 - राजकीय वादात न पडण्याच्या कारणावरून जिवाभावाच्या मित्रावर व त्याच्या कुटुंबियांवर 25 ते 30 जणांच्या सहाय्याने खुनी हल्ला करण्यात आल्याचा प्रकार खडकपाडा परिसरात घडला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनीं फिर्यादी एकनाथ म्हात्रे यांच्या तक्रारीवरून आरोपी चिंतामण निळजेकर याच्यासह त्याचा मुलगा बबलू व इतर 25 ते 30 जणांवर प्राणघातक हत्यारांनी हल्ला करणे आणि दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.
दोन दिवसांपूर्वी एका राजकीय व्यक्तीला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता.या प्रकरणी संबंधित पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक डिसीपी कार्यालय येथे रात्री उशिरा पर्यँत जमा होते .दरम्यान यातील चिंतामण निळजेकर याने फिर्यादी एकनाथ म्हात्रे यांना तू कल्याण पश्चिमेच्या कोणत्याही राजकीय वादात कोणाच्याही बाजूने उभे राहायचे नाही असा सल्ला दिला मात्र म्हात्रे याने यावर आपण ही कोणाच्या बाजूने उभे राहणार नाही तू पण नको राहुस असे सांगितले.त्यामुळे रागावून थोड्या वेळाने चिंतामण निळजेकर याने म्हात्रेला फोन करून मी तुला मारायला येत आहे तयारीत राहा असे बोलून आपल्या साथीदारांसह येऊन एकनाथ म्हात्रे वर हल्ला केला मात्र तलवारीचा वार म्हात्रे ने चुकवला यावेळी मध्यस्थीसाठी आलेल्या म्हात्रे याचा नातेवाईक किसन भोईर याच्या डोक्यावर वार करण्यात आला तर इतर लोकांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली.अशी फिर्याद एकनाथ म्हात्रे याने बाजारपेठ पोलीस स्टेशनला रात्री उशिरा दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.