कल्याण रेल्वे पोलिसांकडून आठ कोटींचा मुद्देमाल प्रवाशांना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:27 AM2021-07-02T04:27:19+5:302021-07-02T04:27:19+5:30

कल्याण : रेल्वे प्रवासात प्रवाशांचे चोरीस गेलेले सोने व मोबाईल असा एकूण आठ कोटी रुपयांचा मुद्देमाल प्रवाशांना परत केल्याची ...

Kalyan Railway Police returns Rs 8 crore to passengers | कल्याण रेल्वे पोलिसांकडून आठ कोटींचा मुद्देमाल प्रवाशांना परत

कल्याण रेल्वे पोलिसांकडून आठ कोटींचा मुद्देमाल प्रवाशांना परत

googlenewsNext

कल्याण : रेल्वे प्रवासात प्रवाशांचे चोरीस गेलेले सोने व मोबाईल असा एकूण आठ कोटी रुपयांचा मुद्देमाल प्रवाशांना परत केल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मीक शार्दुल यांनी दिली आहे.

कल्याण रेल्वे पोलिसांच्या हद्दीतील १६ स्थानकांत १९८० पासून लोकल व मेल-एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या चोरीच्या घटनांमध्ये प्रवाशांचे मोबाईल आणि सोन्याच्या वस्तू चोरीस गेल्या होत्या. कल्याण रेल्वे पोलिसांकडे २,८५० वस्तूंचा मुद्देमाल पडून होता. त्यात सोन्याचे दागिने, मोबाईल आदी वस्तू होत्या. तत्कालीन पोलीस आयुक्त राजेंद्र शेनगावकर यांनी पोलिसांना विविध गुन्ह्यांत आरोपीकडून जप्त केलेला माल परत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कल्याण रेल्वे पोलिसांनी २,७०० मुद्देमाल प्रवाशांना परत केला असून, त्याची किंमत आठ कोटी इतकी आहे. अनेक प्रवासी हे परराज्यांतील असतात. त्यांची नावे, पत्ते शोधून त्यांना बोलावून, तर काही प्रवाशांच्या घरी जाऊन त्यांचा चोरीस गेलेला मुद्देमाल परत केल्याचे शार्दुल म्हणाले.

शार्दुल यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. २०१८ मध्ये ३,२७८ गुन्हे घडले. त्यापैकी ५०६ उघडकीस आले, तर ६९६ आरोपींना अटक झाली. २०१९ मध्ये ३,४९२ गुन्हे घडले. त्यापैकी ६७५ गुन्हे उघडकीस आले. ७४७ आरोपींना अटक केली. २०२० मध्ये ७३३ गुन्हे घडले असून, १५५ गुन्हे उघडकीस आले. १८४ आरोपींना अटक झाली. २०२१ मध्ये आतापर्यंत ३५० गुन्हे घडले. त्यापैकी १०५ उघडकीस आले असून, १२२ आरोपींना अटक झाली आहे.

... तर आरोपी अधिक जलद गतीने पकडणे शक्य

- कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याची हद्द कल्याण ते बदलापूर आणि कल्याण ते कसारा इतकी मोठी आहे. या १६ स्थानकांत ५९२ सीसीटीव्ही आहेत. त्यापैकी २०४ सीसीटीव्ही कल्याण स्थानकात आहेत. सीसीटीव्हीमुळे आरोपीची ओळख लवकर पटते.

- १६ स्थानकांत आणखी प्रत्येकी २६ सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव आहे. या सगळ्य़ा सीसीटीव्हीची कंट्रोल रूमची लिंक कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात दिल्यास आरोपी अधिक जलद गतीने पकडणे शक्य होईल, याकडे शार्दुल यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

------------------------

Web Title: Kalyan Railway Police returns Rs 8 crore to passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.