कल्याण आरटीओने दिली १० हजार लर्निंग लायसन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 12:12 AM2020-10-09T00:12:24+5:302020-10-09T00:12:28+5:30

कोरोनामुळे मार्चपासून रेंगाळले होते ग्राहक; वेटिंग कालावधी तीन दिवसांवर आणण्याचा प्रयत्न

Kalyan RTO issued 10 thousand learning licenses | कल्याण आरटीओने दिली १० हजार लर्निंग लायसन्स

कल्याण आरटीओने दिली १० हजार लर्निंग लायसन्स

Next

- अनिकेत घमंडी

डोंबिवली : मार्च महिन्यापासून नव्याने वाहन चाहलवणाऱ्या वाहनचालकांना लायसन्स देण्याची कार्यवाही लॉकडाऊनमुळे ठप्प झाली होती. जुलैपासून राज्य शसनाने १५ टक्के तर,आता ३० टक्के कर्मचारी कामावर बोलवल्याने लर्निंग लायसन्स देण्याची रखडलेली कामे करण्याला वेग आला आहे. केवळ कल्याण आरटीओ कार्यालयातून सप्टेंबर महिन्यात १० हजार लर्निंग लायसन्स वितरीत करण्यात आली.

नवनियुक्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण म्हणाले की, मार्चपासून बहुतांश कामे खोळंबली होती. लर्निंग लायसन्सकरिता अनेक नवशिके वाहनचालक रेंगाळले होते. त्यांना तातडीने लायसन्स देण्याकरिता शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी कामे करावीत, असे राज्य शासनाचे निर्देश होते.

त्यानुसार गेल्या महिन्यात अधिक काळ कामे करून तब्बल दहा हजार जणांना लर्निंग लायसन्स वितरीत केली. आॅक्टोबर महिन्यात उर्वरित लोकांना लर्निंग लायसन्स देण्यात येईल. लॉकडाऊनमुळे रखडलेली कामे मार्गी लावून लर्निंग लायसन्स मिळण्याकरिता वेटिंगचा कालावधी तीन दिवसांवर आणण्याचा आरटीओ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रयत्न आहे.

अपुºया मनुष्यबळातही मोठा टप्पा पार
पक्की लायसन्सदेखील वेगाने देण्यात येणार आहेत. वाहनांचा कर, तसेच अन्य तांत्रिक कामे करण्यावर भर देण्यात येत आहे. कल्याण कार्यालयांतर्गत असलेले तीन अधिकारी कल्याण रेल्वेस्थानक परिसरातील बस, टॅक्सी वाहतुकीच्या नियोजनात व्यस्त आहेत, दोन अधिकाºयांना कोरोनाची लागण झाली आहे. अपुरे मनुष्यबळ असल्याने कामाचा ताण आहे, पण तरीही सर्व सहकाºयांनी लर्निंग लायसन्स वितरणाचा मोठा टप्पा पार केला. राज्यात उल्लेखनीय कार्य केलेल्या आरटीओ कार्यालयांमध्ये कल्याण आरटीओचा समावेश होत आहे, असे चव्हाण म्हणाले.

Web Title: Kalyan RTO issued 10 thousand learning licenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.