Kalyan: आंबिवलीच्या इराणी वस्तीत चोरट्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक
By मुरलीधर भवार | Published: August 30, 2023 05:08 PM2023-08-30T17:08:42+5:302023-08-30T17:09:10+5:30
Crime News: कल्याणनजीक असलेल्या आंबिवलीतील इराणी वस्तीत एका भामट्याला पकडण्यासाठी मुंबईतील डीएननगर आले असता आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली.
- मुरलीधर भवार
कल्याण - कल्याणनजीक असलेल्या आंबिवलीतील इराणी वस्तीत एका भामट्याला पकडण्यासाठी मुंबईतील डीएननगर आले असता आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली. पोलिस आणि आरोपीच्या नातेवाईकांमध्ये झटापट झाली. अखेरी पोलिसांनी इराणी भामट्याचा मुसक्या आवळल्या. त्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव फिरोज खान असे आहे.
पोलिस असल्याची बतावणी करुन एका इसमाला एक लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना मुंबईतील अंधेरी परिसरात घडली होती या प्रकरणी अंधेरी डीएन नगर पोलिस ठाण्याचे पाेलिसांनी गुन्हा दाखल केला होता. इसमाला एक लाखाचा गंडा घालणाऱ््या चोरट्याचा पोलिसांनी शोध सुरु केला. पोलिसांनी काही ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. त्यात त्याचा ठावठिकाणी लागला. चोरटा हा अनेक गुन्ह्यात फरार असल्याची माहिती समोर आली.
चोरटा फिरोज खान याला पकडण्यासाठी शोध मोहिम सुरु केली. तो आंबिवली येथील इराणी वस्तीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. त्याठिकाणी पोलिसांचे एक पथक वस्तीच्या आसपास दबा धरुन बसले. पोलिस फिरोजला पकडण्यासाठी गेले असता पोलिसांना रोखण्याकरीता त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. पोलिस आणि फिरोजच्या नातेवाईकांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी नातेवाईकांचा प्रतिकाराला न जुमानता अखेरस फिरोजच्या मुसक्या आवळल्या. त्याला अटक करुन मुंबईला घेऊन गेले. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. फिरोज हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात ३५ गुन्हे दाखल आहेत.