Kalyan: कल्याणच्या जलतरण खेळाडूंची मोहीम फत्ते, मुरुड-जंजिरा ते पद्मदुर्ग हे अंतर केले पार 

By मुरलीधर भवार | Published: February 24, 2023 03:35 PM2023-02-24T15:35:57+5:302023-02-24T15:36:35+5:30

Kalyan: राज्यातील अनेक गड किल्ले यांची दुरावस्था झाल्याने याकडे राज्य सरकारचे  लक्ष वेधण्याकरीता शिवजंयती निमित्त सेक्रेड हार्ट स्कूल कल्याणचे १४ विद्यार्थ्यांनी मुरुड जंजिरा ते पदमदुर्ग किल्ला असे एकूण ९ किलाे मीटरचे अंतर पोहून पार केले.

Kalyan: Swimmers from Kalyan complete their campaign, Murud-Janjira to Padmadurg | Kalyan: कल्याणच्या जलतरण खेळाडूंची मोहीम फत्ते, मुरुड-जंजिरा ते पद्मदुर्ग हे अंतर केले पार 

Kalyan: कल्याणच्या जलतरण खेळाडूंची मोहीम फत्ते, मुरुड-जंजिरा ते पद्मदुर्ग हे अंतर केले पार 

googlenewsNext

- मुरलीधर भवार

कल्याण - छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या राज्यातील अनेक गड किल्ले यांची दुरावस्था झाल्याने याकडे राज्य सरकारचे  लक्ष वेधण्याकरीता शिवजंयती निमित्त सेक्रेड हार्ट स्कूल कल्याणचे १४ विद्यार्थ्यांनी मुरुड जंजिरा ते पदमदुर्ग किल्ला असे एकूण ९ किलाे मीटरचे अंतर पोहून पार केले. सर्व मुले १२ ते १८ गटातील असल्याने या मुलांवर अभिनंदनाचा वर्षाव हाेत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या आणि आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष असलेल्या गड- किल्ल्यांकडे आजच्या पिढीचे दुर्लक्ष होत आहे. या उपक्रमामुळे जलदुर्गा आणि गड किल्ले कडे लोकांचे लक्ष वेधावे आणि त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याची प्रेरणा मिळावी, महाराजांच्या इतिहासाची माहिती मिळावी अशा उदात्त हेतूने हा उपक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती या मोहिमेचे प्रमुख श्रीराम म्हात्रे यांनी दिली.

या जलतरण माेहिमेत कल्याणचे सक्षम म्हात्रे, अधिराज म्हात्रे, रोनित म्हात्रे, अमोदिनी तोडकर, समृद्धी शेट्टी, तृष्णा शेट्टी, अद्विता जोडकर, अभिप्रीत विचारे, ऋतुराज विचारे, श्रीरंग साळुंखे, सिद्धार्थ पात्रा, मयंक पात्रा, निनाद पाटील, समर मोहोपे हे धाडशी विद्यार्थी सहभागी झाले हाेते. ही मोहीम यशस्वीपणे पार पडली. या मुलांच्या साेबत शिक्षक रामचंद्र म्हात्रे, काशीनाथ मोहोपे, संदीप तोडकर, देवेन्द्र साळुंखे, निलेश पाटील हे देखील सहभागी झाले हाेते.

उपक्रमाची सुरवात जंजिरा किल्ल्यातून झाल्याने हजरो पर्यटकांनी मुलांना टाळ्या वाजवून प्रोत्साहित केले. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर जय शिवाजी जय जिजाऊ शिवरायांच्या गजरात मुलाची पोहायला सुरवात करुन न दमता एकादमात हे अंतर पार केले. मुले पद्मदुर्गाला पोहचली तेव्हा तिकडेही पर्यटक असल्याने त्यांनी शिवगर्जनेत मुलांचे स्वागत केले किल्यात जाऊन भगवा ध्वज फडकविला.

मुरुड समुद्रकिनारी किल्ल्यात जाण्याची तयारी सुरु असताना मुरूडचे मुख्याधिकारी पंकज भुसे रास्त्यावरून जात होते. त्यांनी विचारले हि मुले कुठे जात आहेत. जंजिरा किल्ल्या पोहून जाणार हे समजताच गाडीतून उतरले आणि मी देखील यांच्या सोबत पोहून जाणार म्हणून बोटीत बसले. कोणतेही पोहण्याचे साधन नसताना गॉगल, टोपी . स्विमिंग सूट नसताना समुद्रात पोहण्यासाठी उतरले आणि न थांबता त्यांनीही अंतर पार केले. भुसे हे महाविद्यालयिन काळात आंतरराष्ट्रीय जलतरणाच्या माेहिमा करीत आले आहेत. या  मोहिमेसाठी सेक्रेट हॉट शाळेचे संचालक अल्विन अंथोनी आणि मुख्याध्यापक विनिता राज यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Web Title: Kalyan: Swimmers from Kalyan complete their campaign, Murud-Janjira to Padmadurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.