स्विमिंग सुरक्षेच्या गटांगळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 06:33 AM2018-05-28T06:33:40+5:302018-05-28T06:33:40+5:30

सुट्या असल्याने स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या तानिया गुप्ता (५) या मुलीचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने जलतरण तलावांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

kalyan Swimming Pool News | स्विमिंग सुरक्षेच्या गटांगळ्या

स्विमिंग सुरक्षेच्या गटांगळ्या

Next

- सचिन सागरे
डोंबिवली - सुट्या असल्याने स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या तानिया गुप्ता (५) या मुलीचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने जलतरण तलावांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यानिमित्ताने कल्याण-डोंबिवली शहरातील मोठ्या गृहसंकुलांमधील स्विमिंग पुलांचा आढावा घेतला असता, सुरक्षेचे दावे त्यांच्याकडून भले केले जात असले; तरी शुक्रवारच्या घटनेने त्यांच्या सुरक्षेची पोलखोल झाली आहे.
कल्याण-डोंबिवलीमध्ये मोठमोठी गृहसंकुले उभी रहात आहेत. आकर्षण उद्याने, खेळांची साधने, पार्किंग आणि जलक्रीडेचा आनंद लुटण्यासाठी स्विमिंग पूल यांचा समावेश गृहसंकुलांमध्ये केला जातो. अशा संकुलांची संख्या सुमारे १५ ते २० आहे.
पालिकेच्या सावळाराम महाराज क्रीडासंकुलात तरणतलाव आहे. तो पालिका चालवते. कल्याण स्पोर्टस क्लबचे बीओटी तत्वावर कंत्राट दिले आहे. डोंबिवली जिमखान्यातही तरणतलाव आहे. रितसर शुल्क घेऊन त्यांचे योग्य कंत्राट दिलेल्या, चांगले व्यवस्थापन ठेवलेल्या ठिकाणी सुरक्षेची काळजी घेतली जात असल्याचे दिसते. कासा रियो येथील दुर्घटनेनंतर तेथील सुरक्षाव्यवस्थेचा ढिसाळपणा उघड झाला आहे. अशाच अन्य मोठ्या गृहसंकुलांचा आढावा घेता, तेथे खबरदारी म्हणून जीवरक्षक तसेच प्रशिक्षक पुरेशा प्रमाणात ठेवले जात असल्याचे सांगण्यात आले. पण ते पूर्णवेळ उपस्थित असतात का, याचे नेमके उत्तर कुणाकडे नव्हते. जीवरक्षक नसताना कोणी पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केल्यावर ‘तुमच्या जबाबदारीवर उतरा’ असे सांगून सुरक्षारक्षक हात वर करतात असा अनुभव असल्याचे रहिवाशांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. घसघशीत मेन्टेनन्स वसूल करूनही सुरक्षेची काळजी घेत नसतील, तर तरणतलावांचे व्यवस्थापन पाहणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा, असे मतही त्यांनी मांडले.
तरणतलावांचे ‘सेफ्टी आॅडिट’ होतच नसल्याचे उघड झाले आहे. पालिकेसह सर्व संबंधित यंत्रणांकडे चौकशी केल्यावर किती ठिकाणी असे तरणतलाव आहेत, याची प्राथमिक आकडेवारीही त्यांच्याकडे नाही. त्यामुळे आणखी बळी जाण्यापूर्वी ते व्हावे, असे रहिवाशांनी सांगितले.

निष्काळजीपणाचे नमुने या आधीही

च्सोसायटीच्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी उतरलेली दृष्टी सिंग (९) ही मुलगी बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना मे २०१६ मध्ये घडली होती. यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकाविरोधात खडकपाडा पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला होता.

च् केडीएमसीच्या सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील स्विमिंग पूलमध्ये शरद परिहार (२२) या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नोव्हेंबर २०१७ मध्ये घडली होती. पोहताना नशेमुळे त्याचा मृत्यू झाला होता. तत्पूर्वीही मे महिन्याच्या सुटीत नजर चुकवून पाण्यात शिरलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला होता.

Web Title: kalyan Swimming Pool News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.