प्रदूषणमुक्तीचा संदेश देत विद्यार्थ्यांचा कल्याण ते ठाणे सायकल प्रवास; केम्ब्रिआ इंटरनॅशनल शाळेचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 03:58 PM2021-01-26T15:58:52+5:302021-01-26T16:00:43+5:30
कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनने पर्यवरणाचे संवर्धन करण्यात मोठी भूमिका बजावली. या काळात जलप्रदूषणाबरोबरच हवेतील प्रदूषणही लक्षणियरित्या कमी झालेले पाहायला मिळाले.
कल्याण : कोरोनानंतर प्रदूषणाचे प्रमाण पुन्हा वाढले असून प्रदूषणमुक्त पर्यवरणाचा संदेश देण्यासाठी कल्याणमधील शालेय विद्यार्थ्यांनी कल्याण ते ठाणे, असा प्रवास केला. कल्याणमधील केम्ब्रिआ इंटरनॅशनल शाळेच्या पुढाकाराने हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनने पर्यवरणाचे संवर्धन करण्यात मोठी भूमिका बजावली. या काळात जलप्रदूषणाबरोबरच हवेतील प्रदूषणही लक्षणियरित्या कमी झालेले पाहायला मिळाले. मात्र लॉकडाऊननंतर सर्व व्यवहार सुरू झाले आणि पुन्हा एकदा पर्यवरण रक्षणाचा प्रश्न समोर आला. कोरोना काळात आरोग्याबरोबरच पर्यवरणाचे महत्वही अधोरेखित झाले. या पार्श्वभूमीवर केम्ब्रिआ इंटरनॅशनल शाळेकडून 26 जानेवरीचे औचित्य साधून हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. सायकल चालवण्यातून आपण पर्यावरण रक्षण करण्याबरोबरच आपले आरोग्य सुधारण्यासाठीही मोठा हातभार लावू शकतो. हाच संदेश घेऊन शाळेचे पीटी शिक्षक अमोल शिंदे आणि शाळेच्या काही विद्यार्थ्यांनी कल्याण ते ठाणे, असा सायकल प्रवास केला.
कोरोना काळात राखले गेलेल्या पर्यावरण आणि आपल्या आरोग्याचे संतुलन पुन्हा तसेच राखण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबविल्याची माहिती पोटे ग्रुपचे सीएमडी बिपीन पोटे यांनी दिली. तसेच जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सायकल किंवा चालत जाण्याचे आवाहनही बिपीन पोटे यांनी केले. यावेळी केम्ब्रिआ इंटरनॅशनल शाळेच्या मीनल पोटे यांच्यासह हिना फाळके, सभिता राव, बिना नायर, लता मॅडम आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.