कल्याण-ठाणे-वसई जलवाहतूक डिसेंबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 01:02 AM2018-03-27T01:02:16+5:302018-03-27T01:02:16+5:30
ठाणे पालिकेच्या महत्त्वांकाक्षी जलवाहतूक प्रकल्पाच्या पहिल्या टप्यातील वसई - ठाणे - कल्याण या मार्गांवर डिसेंबरपर्यंत वाहतूक
ठाणे : ठाणे पालिकेच्या महत्त्वांकाक्षी जलवाहतूक प्रकल्पाच्या पहिल्या टप्यातील वसई - ठाणे - कल्याण या मार्गांवर डिसेंबरपर्यंत वाहतूक सुरु होईल, अशी माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी दिली. ज्या ठिकाणी पाण्याला खोली असेल त्या मार्गावर बोट धावणार असल्याचे सांगून खाजगीकरणातून म्हणजेच जीसीसी तत्त्वावर या बोटी धावतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकल्पामुळे वेळ, पैशाची होईल. वाहतूककोंडीतून सुटका होईल, असा दावा त्यांनी केला. यावेळी महाराष्टÑ मेरीटाईम बोर्डचे सीईओ विक्रमकुमार, गोवा आणि कोच्ची शिप यार्डचे अधिकारी, इतर पालिकांचे अधिकारी उपस्थित होते. पहिल्या टप्यात वसई - मीरा-भाईंदर - ठाणे कोलशेत, घोडबंदर रोड, साकेत- दिवा-भिवंडी- कल्याण हा २५ नॉटिकल मैल म्हणजेच ४५ किमी लांबीचा ७० मिनिटांचा जलवाहतूक मार्गआहे. यासाठी ६५० कोटींचा निधी केंद्राकडून मिळणार आहे. कोलशेत येथे या जलवाहतुकीचे मल्टी मॉडेल हब विकसित केले जाईल. तेथे बोटी दुरुस्त केल्या जातील. पहिल्या टप्प्यासाठी पालिका ८ ते १० प्रवासी क्षममेच्या दोन ते तीन बोट घेणार आहे.
पहिल्या टप्यातील डीपीआर तयार झाला असून त्याचे सादरीकरण दोन दिवसात दिल्लीत होणार असून त्यात त्याला तत्वत: मंजुरी मिळेल.
मालवाहू जलवाहतूक, प्रवासी आणि पर्यटन अशा तीन स्तरावर जलवाहतूक सुरू होणार असल्याने पालिकेला चांगला महसूल मिळेल. त्यामुळे रस्ते आणि रेल्वेवरील भार कमी होईल. पर्यटनसाठीही जलवाहतुकीचा विकास करण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशन आणि मुख्य महामार्गापासून जलवाहतूक किती अंतरावर असेल याचाही अभ्यास करण्यात आला आहे. वसईला रेल्वे स्टेशनपासूनचे अंतर हे ४ किमी आणि आणि रस्त्याचे अंतर ० किमी असणार आहे. तर कल्याण जेटीचे अंतर हे रेल्वे स्टेशपासून अवघे १.७१ किमी असणार असून रस्त्यापासून ते ५० मीटरवर असणार आहे. तर ठाण्यातील कोलशेतचे हबचे अंतर हे कळवा रेल्वे स्टेशनपासून ५ किमी आणि रस्त्यापासून ७० मीटर असेल.
या जलवाहतुकीच्या दुसऱ्या टप्यात ठाणे, नवी मुंबई, मुंबई याचे काम करण्यात येणार आहे. या संदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल ठाणे महापालिकेने केला आहे. पहिल्या टप्यासाठीचा संपूर्ण निधी हा केंद्राकडून मिळणार आहे. परंतु, दुसºया टप्यासाठीचा निर्णय अद्याप झालेला नाही. असे असले तरी ठाणे महापालिका या दुसºया टप्याचे काम करणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.