Kalyan: गर्दीत रेल्वे प्रवाशांचे मोबाइल चोरणारे सराईत चोरटे गजाआड, कल्याण रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By मुरलीधर भवार | Published: August 30, 2023 05:05 PM2023-08-30T17:05:56+5:302023-08-30T17:06:15+5:30
Kalyan: गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्या दोन सराई चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जहीर शेख आणि अजय आल्हाट अशी या चोरट्यांची नावे आहेत.
- मुरलीधर भवार
कल्याण - गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्या दोन सराई चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जहीर शेख आणि अजय आल्हाट अशी या चोरट्यांची नावे आहेत. जहीर याने मेल एक्स्प्रेस पकडण्याच्या घाईत असलेल्या प्रवाशाचा मोबाइल चोरला. त्यानतंर तीन तासांनंतर पुन्हा तो दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर दुसऱ्या प्रवाशाचा मोबाइल चोरण्याच्या प्रयत्नात होता. येथे गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांना जहीर दिसताच त्यांनी त्याला अटक केली.
कल्याण रेल्वे स्थानकात लोकल, मेल एक्स्प्रेसमध्ये चढताना प्रवाशांचे मोबाइल चोरी होण्याच्या घटना वाढल्या होत्या. गर्दीचा फायदा घेत चोरटे हातचलाखीने प्रवाशांचे मोबाइल लंपास करत होते. या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे पोलिसांनी या चोरट्याचा शोध सुरू केला. राज्य राणी एक्स्प्रेस मेलमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने प्रवाशाचा मोबाइल चोरल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. रेल्वे पोलिसांनी तत्काळ या चोरट्याचा शोध सुरू केला.
चोरीनंतर काही तासांतच कारवाई
काही तासातच एकजण संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. रेल्वे पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेत चौकशी केली. त्याच्याजवळ चोरी केलेला मोबाइल मिळून आला. जहीर शेख (मूळ. भुसावळ) असे या चोरट्याचे नाव आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्या अजय आल्हाट यालाही बेड्या ठोकल्या. अजयच्या विरोधात या आधी रेल्वे पोलिस ठाण्यात मोबाइल चोरीच्या गुन्हा दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.