Kalyan: भाजप आमदाराची बदनामी करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पदाधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात धाव

By मुरलीधर भवार | Published: June 19, 2023 04:39 PM2023-06-19T16:39:19+5:302023-06-19T16:39:55+5:30

Kalyan: भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा ओरीजनल व्हिडीओ एडिट करुन त्यामध्ये कुत्र्याच्या भूंकण्याचा आवाज टाकला आहे. आमदारांची खिल्ली उडवित बदनामी केली आहे.

Kalyan: Video defaming BJP MLA goes viral on social media, officials rush to police station | Kalyan: भाजप आमदाराची बदनामी करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पदाधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात धाव

Kalyan: भाजप आमदाराची बदनामी करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पदाधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात धाव

googlenewsNext

- मुरलीधर भवार
कल्याण - भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा ओरीजनल व्हीडीओ एडीट करुन त्यामध्ये कुत्र्याच्या भूंकण्याचा आवाज टाकला आहे. आमदारांची खिल्ली उडवित बदनामी केली आहे. सोशल मिडियावर हा व्हीडीआेव्हायरल करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजपने कोळसेवाडी पाेलिस ठाण्यात धाव घेतली आहे. सोशल मिडीयावर आमदारांची बदनामी करणाऱ््याला त्वरीत अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

भाजप आमदार गायकवाड यांचा वाढदिवस १४ जून रोजी होती. त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काढले. या प्रकरणानंतर आमदार संतापले. त्यांनी प्रभाग अधिकारी भरत पाटील यांना रस्त्यात गाठून त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला. तसेच अशा प्रकारचे कामगिरी करा. मात्र बेकायदा ब’नरच्या विरोधात आमदारांनी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करता. कायदा आमदारांसाठी आहे का अन्य बेकायदा बॅनर लावणाऱ्यांच्या विरोधात नाही का असा संतप्त सवाल केला. यानंतर आमदारांनी अधिकाऱ्यांसोबत नालेसफाईच्या कामाची पाहणी करीत अधिकारी वर्गाला चांगलेच धारेवर धरले. यावेळी आमदार अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असल्याच्या व्हिडीओ एडीट करुन त्यात कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज टाकला आहे. हा व्हिडीओ व्हायरल करुन आमदारांची खिल्ली उडवून त्यांची बदनामी केली आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत भाजप पदाधिकारी संजय मोरे, प्रमिला जाधव, गुड्डू खान, सौरभ सिंग यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरिक्षक सुनिल गवळी यांना भाजप शिष्टमंडळाने निवेदन दिले. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदारांची बदनामी करणाऱ््या त्वरीत अटक करण्यात यावी. या बदनामी मागे राजकीय विरोधक असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या संदर्भात पोलिस निरिक्षक गवळी यांनी सांगितले की, भाजपचे निवेदन प्राप्त झाले आहे. चौकशी करुन कायदेशीर कारवाई केली जाईल.

Web Title: Kalyan: Video defaming BJP MLA goes viral on social media, officials rush to police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.