कल्याण डोंबिवलीतील कंटेनमेंट झोनच्या बाहेरील दुकाने सुरु करण्यास परवानगी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 06:24 PM2020-05-14T18:24:59+5:302020-05-14T18:25:10+5:30

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रती कंटेनमेंट झोनबाहेरील व्यवसाय व दुकाने सुरु करण्यास टप्प्या टप्प्याने परवानगी दिली जाणार आहे. ...

Kalyan will allow shops outside the containment zone in Dombivali | कल्याण डोंबिवलीतील कंटेनमेंट झोनच्या बाहेरील दुकाने सुरु करण्यास परवानगी देणार

कल्याण डोंबिवलीतील कंटेनमेंट झोनच्या बाहेरील दुकाने सुरु करण्यास परवानगी देणार

Next

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रती कंटेनमेंट झोनबाहेरील व्यवसाय व दुकाने सुरु करण्यास टप्प्या टप्प्याने परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील कंटेनमेंट झोनबाहेरील आस्थापनांना प्रथम दिलासा मिळणार आहे.


महापालिका हद्दीत आत्तार्पयत कोरोनाचे 391 रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने कल्याण डोंबिवली महापालिका ही कोरोनाचा हॉटस्पॉट बनली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना केल्या आहे. त्यात वेळोवेळी सुधारणा केली आहे. दिवसा दुपारी दोन वाजेर्पयत भाजीपाला व जीवनाश्यवक वस्तूंची दुकाने सुरु असतात. या दुकानातून घरपोच सेवा दिली जावी असे महापालिकेने सूचित केले होते. तसेच महापालिकेने हेल्पलाईन सुरु केली होती. ऑन कॉल रिक्षा सुरु केली होती. सुरुवातीला महापालिकेच्या 122 प्रभागापैकी केवळ 2क् प्रभागात कोरोनाचे रुग्ण आढळून होते. त्यामुळे हे 2क् प्रभाग कंटेनमेंट झोन घोषित केले होते. त्याचबरोबर कोरोनाचे सहा  प्रभाग हे हॉटस्पॉट घोषित केले होते. आत्ताच्या घडीला महापालिका हद्दीत 78 कंटेनमेंट झोन आहे.

या झोन व्यतिरिक्त या झोन बाहेरील दुकाने आस्थपना सुरु करण्याची परवानगी दिली जाणर आहे. दैनंदिन कामकार पार पाडण्यासाठी डॉ. सुप्रिया अमेय व विजयालक्ष्मी शिंदे यांनी मागर्दशक सूचना तयार केल्या आहे. त्यांचे पालन दुकान मालक, काऊंटवर काम करणारे कामगार, नागरीक यांनी कशा प्रकारे करायचे आहे. ही दक्षता घेतली जाण्याची हमी ज्या अस्थापना देतील. त्यांना त्यांची दुकाने व व्यवसाय सुरु करण्याची परवानगी दिली जाणार आहे.

Web Title: Kalyan will allow shops outside the containment zone in Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.