Kalyan: कल्याणमध्ये वीजेच्या पोलवर काम करत असताना कर्मचारी गंभीर जखमी
By मुरलीधर भवार | Updated: January 4, 2024 15:21 IST2024-01-04T15:20:31+5:302024-01-04T15:21:06+5:30
Kalyan News: महावितरणच्या पोल वर काम करत असताना विजेच्या जोरदार धक्याने महावितरणचा कंत्राटी कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. पिंटू सिरोज असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Kalyan: कल्याणमध्ये वीजेच्या पोलवर काम करत असताना कर्मचारी गंभीर जखमी
- मुरलीधर भवार
कल्याण - महावितरणच्या पोल वर काम करत असताना विजेच्या जोरदार धक्याने महावितरणचा कंत्राटी कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. पिंटू सिरोज असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बैल बाजार परिसरातील वीजेच्या पोलवरवर चढून पिंटू हा देखभाल दुरुस्थीचे काम करीत होता. वीजेची लाईन सुरु असल्याने पिंटू याला वीजेचा जोरदार झटका लागला. या घटनेत तो जखमी झाला आहे. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीचे काम करताना कामगारांची सुरक्षितता जोपासली जात नाही ही बाब समोर आली आहे.