#KamalaMillsFire: ठाण्यातील हॉटेल आणि पब असुरक्षित असल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 02:53 AM2017-12-30T02:53:56+5:302017-12-30T02:54:04+5:30

ठाणे : लोअर परळच्या घटनेनंतरसरकारने दिलेल्या आदेशामुळे हॉटेलांच्या सुरक्षेबाबत ठाणे जिल्हा प्रशासन जागे झाले असले, तरी ठाणे महापालिका क्षेत्रातील एकही हॉटेल किंवा पबने अग्रिशमन दलाची एनओसीच घेतली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

#KamalaMillsFire: In Thane, hotels and pubs are unsafe | #KamalaMillsFire: ठाण्यातील हॉटेल आणि पब असुरक्षित असल्याचे उघड

#KamalaMillsFire: ठाण्यातील हॉटेल आणि पब असुरक्षित असल्याचे उघड

Next

ठाणे : लोअर परळच्या घटनेनंतरसरकारने दिलेल्या आदेशामुळे हॉटेलांच्या सुरक्षेबाबत ठाणे जिल्हा प्रशासन जागे झाले असले, तरी ठाणे महापालिका क्षेत्रातील एकही हॉटेल किंवा पबने अग्रिशमन दलाची एनओसीच घेतली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. इतर शहरांतही सुरक्षेबाबत अशीच स्थिती असून ठाणे जिल्ह्यात रस्तोरस्ती पसरलेल्या ढाब्यांनीही नियम धाब्यावर बसवल्याचे स्पष्ट झाले.
आॅक्टोबरमध्ये ठाण्यातील कोठरी कंपाउंड येथे लागलेल्या आगीनंतर सुरक्षेसंदर्भात परवानगी न घेणाºया तब्बल ४५० हॉटेलधारकांना अग्निशमन दलाने नोटिसा बजावल्या. दाखवण्यापुरती कारवाई झाली. पण अनेक हॉटेल, बार, पब अनधिकृत असल्याने एकानेही सुरक्षेची एनओसी न घेताच ते सुरू ठेवल्याचे उघड झाले.
लोअर परळच्या अग्नितांडवानंतर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग, महापालिका अग्रिशमन अधिकारी, पोलीस यंत्रणा, शहरातील मॉल व रिसॉर्टधारकांची बैठक घेत, सुरक्षेसंदर्भात सूचना केल्या. कार्यक्र मांना परवानगी देण्यापूर्वी अग्निसुरक्षेची खातरजमा करावी, असे आदेश दिले. उत्पादन शुल्क, अन्न व औषध प्रशासन, पोलीस, पालिका व त्यांच्या अंतर्गत अग्निशमन विभागांनी पथके तयार करून सर्वसामान्य जनतेचे प्रबोधन करण्यास त्यांनी सांगितले.
ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी जेथे-जेथे बंदिस्त क्षेत्रात, आगीचा संबंध येणारे कार्यक्र म होणार असतील, अशा सर्व ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत परवानगी आवश्यक असल्याचे सांगितले. राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिसांकडे आलेले परवानगी अर्ज त्यांनी संबंधित ापालिकांकडे पाठवावे. त्यांनी त्या ठिकाणांची पाहणी करून संबंधितांना नोटिसा काढून अग्निशमन परवाना आवश्यक असल्याचे निदर्शनास आणावे, असेही त्यांनी सांगितले. अशा परवान्यांसाठी एक खिडकी यंत्रणा सुरू करावी. सुरक्षेची सर्व जबाबदारी संबंधित अग्निशमन दल, संबंधित उपायुक्त, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांवर राहणार आहे.
>कल्याणमध्येही नियमभंग
बºयाचशा छोटेखानी हॉटेलमध्ये सुरक्षेचे नियम सर्रास धाब्यावर बसवल्याचे दिसून आले. अशा उपहारगृहात प्रवेशद्वाराजवळच खाद्यपदार्थ गॅस शेगडी-सिलिंडरवर बनवले जातात. नियमानुसार प्रवेशद्वाराजवळ ज्वलनशील वस्तू ठेवता येत नाहीत. पण जुना स्टेशन रोड, बैलबाजार रोड, मोहना गेट, टिटवाळा स्टेशन परिसरासारख्या ठिकाणी बिनदिक्कत सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याचे आढळून आले.
कल्याणच्या थ्री स्टार हॉटेलमधील फायर इस्टिंगरचा कालावधी संपून तीन वर्ष होऊनही ते बदललेले नव्हते. त्यातून मोठी उपहारगृहे याबाबत सजग नसल्याचे दिसते. अग्निशमन यंत्रणा योग्यप्रकारे तपासणी करत नसल्याचे दिसून येते, अशी प्रतिक्रिया प्राणवायू सामाजिक संस्थेचे संयोजक प्रवीण आंब्रे यांनी दिली. तर कल्याण-डोंबिवली शहरातील हॉटेलांचे फायर आॅडिट नियमितपणे होत असल्याचा दावा सहाय्यक अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांनी केला.
>ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात ३१ डिसेंबरच्या एक दिवसाच्या कार्यक्रमासाठी जिल्हा मनोरंजन विभागाकडून परवानगी दिली जाणार आहे. मात्र, ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात एकानेही सुरक्षितेच्या दृष्टीने अॉडिट सोडा, साधी एनओसीही घेतलेली नाही. तसेच मध्यंतरी, ठाण्यात लागलेल्या आगीच्या घटनेनंतर एनओसी न घेणाºया ४५० जणांना नोटिसा बजावल्या आहेत. ’’
- शशिकांत काळे, मुख्य अग्रिशमन दल अधिकारी, ठामपा
>मीरा-भार्इंदरला
फक्त ९२ परवाने
मीरा भार्इंदरमध्ये लॉज-रिसॉर्ट, आॅर्केस्ट्रा बार, बियर बार व हॉटेलांची संख्या ३०० पेक्षा जास्त असूनही फक्त ९२ जणांनीच अग्नीशमन दलाकडून परवाने घेतले आहेत. त्यामुळे वर्षाचे सांगता सोहळे ाणि नववर्ष स्वागताची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे उघड झाले.
ज्यांना परावने दिले आहेत, त्यातील किती जण त्या आधारे सुरक्षा नियमांचे पालन करतात, त्यातील किती जणांची अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहे, हा संशोधनाचा विषय आहे. आधीच बहुतांश बार, लॉज, हॉटेलांत अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्यामुळे आपत्कालिन प्रसंगी लोकांना बाहेर पडण्यासाठी आवश्यक प्रवेशद्वारेही नाहीत.
मुंबईतील आगीनंतर अग्नीशमन दल खडबडून जागे झाले असून सर्व बार, लॉज, रिसॉर्ट, हॉटेल व आॅर्केस्ट्रा बारना नोटिसा बजावणार असल्याचे प्रभारी अग्नीशमन दल प्रमुख प्रकाश बोराडे यांनी सांगितले. अग्निशामक यंत्रणा नसेल, तर थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांना परवानग्या देऊ नये, असे सबंधितांना कळवणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: #KamalaMillsFire: In Thane, hotels and pubs are unsafe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे